Nashik News : घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ खेळणाऱ्या दोन चिमुरड्यांचा डबक्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घडली. या दुर्घटनेत मृत झालेली दोन्ही बालके सख्खी बहिण-भाऊ आहेत. (Sinnar 2 children who went to play drowned in water)
धनश्री रवींद्र भंडकर (वय ४) व अविष रवींद्र भंडकर (वय ५) अशी मृत झालेल्या बालकांची नावे आहेत. रामनगर हे सिन्नर तालुक्यातील आदिवासीबहुल गाव आहे. या ठिकाणी वास्तव्यास असणारी सर्व कुटुंबे आदिवासी समाजाचे आहेत. रवींद्र त्रंबक बंडकर हे आपली पत्नी, वडील यांच्यासमवेत राहतात.
या कुटुंबाकडे जेम तेम शेती असून इतरांच्या शेतात मोलमजुरीची कामे करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. रवींद्र यांना धनश्री व अविष ही दोन अपत्य होती. बुधवारी गावातील एका कुटुंबात लग्न सोहळा होता. त्यामुळे एकमेकांचे नातेवाईक असलेले गावातील बहुतेक रहिवासी सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते.
दुपारी साडेतीन चार वाजेच्या सुमारास भंडकर यांच्या घरापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या डबक्यात दोन लहान मुलांचा मृतदेह तरंगत असल्याचे लग्नकार्याहून गावात येणाऱ्या भाऊराव मंडले, सोमनाथ मंडले यांनी पाहिले. त्यानंतर या दोन्ही मुलांची ओळख पटली. वडील आणि आजोबा बाहेरगावी गेले होते तर आई घरकाम आवरत होती. त्यावेळी सकाळी 11 किंवा 12 वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेली ही दोन्ही मुले पाण्याच्या डबक्याकडे गेली असावीत. (Latest Marathi News)
व खेळताना पाण्यात बुडाली असा संशय आहे. दोघांनाही पाण्याबाहेर काढून प्रारंभी मनेगाव येथे खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस पाटील सविता गोफणे यांनी या प्रकाराची माहिती सिन्नर पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना कळवली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक राठोड, पोलिस उपनिरीक्षक सचिन लहामगे, पोलिस नाईक हेमंत तांबडे, धनाजी जाधव यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. दोन्ही मुलांचे मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात रामनगर येथे या दोन्ही बालकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्या ठिकाणी मुले पाण्यात बुडाली तो खड्डा अनेक वर्षांपासून आहे. मनेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या रामनगर येथील जलकुंभाचे ओव्हर फ्लो चे पाणी या खड्ड्यात जमा होते. या पाण्याचा वापर परिसरातील आदिवासी कुटुंबे धुणे धुण्यासाठी तसेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी करतात. अनेक दिवसांपासून पाणी साचून राहिल्याने त्याला काहीसा हिरवा रंग आला आहे. दिवसभर या ठिकाणी स्थानिकांची येजा सुरू असते. मात्र बुधवारी गावात लग्न असल्यामुळे दुपारपर्यंत या डबक्याकडे कोणी फिरकले नव्हते. खेळण्यासाठी म्हणून गेलेल्या बालकांचा त्यात बळी गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.