celebration after win  esakal
नाशिक

Sinner Assembly Constituency : एकजुटीमुळे सिन्नरला पहिल्या खासदारकीचा मान

अजित देसाई

Sinner Assembly Constituency : राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने सिन्नर तालुक्यातला पहिला खासदार मिळाला. राजाभाऊंसाठी अडचणीचा असणारा खासदारकीचा मार्ग तालुक्यातील जनतेने पक्ष, राजकारण, गटतट बाजूला ठेवून एकजुटीने निवडणूक हातात घेतल्याने सोपा झाला. मतमोजणीवेळी अगदी पहिल्या फेरीपासून मिळणारी आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. त्यात सिन्नरकरांनी दिलेले योगदान निश्चितच ऐतिहासिक ठरले. ( Due to unity Sinner got honor of first MP )

मोदींची गॅरंटी असली तरी महाविकास आघाडीचा सर्वसामान्य चेहरा म्हणून राजाभाऊंनी मतदारांनी आपलेसे केले. प्रचारासाठी मिळालेला विरोधी उमेदवारापेक्षा अधिकचा वेळ नक्कीच सार्थकी लागला. सिन्नरमध्ये प्रत्येक निवडणुकीत दिसणारे जातीय समीकरण या वेळी दिसले नाही. सर्व समाज घटकांनी आपला माणूस म्हणून राजाभाऊंना पाठिंबा दिला. सिन्नरच्या सत्ताकारणात कोकाटे-वाजे गट आहेत.

परंतु आपल्या तालुक्यातील माणसासाठी कोकाटेंचे बळ राजाभाऊंच्या पाठीशी उभे राहिले. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करूनदेखील कोकाटे यांनी गोडसेंच्या प्रचारात रस दाखवलाच नाही. त्याचा अर्थ कार्यकर्त्यांनी योग्य तो घेतला. सिन्नरमध्ये महायुतीची ताकद तशी कागदावरच म्हणावी लागेल. सिन्नरमध्ये पक्षियपेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारणाचे वलय आहे. त्यात वाजे यांच्याभोवती लोकसभेचा सिन्नर विधानसभा मतदारसंघ फिरत होता.(latest marathi news)

कार्यकर्ते लोकसभेचा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत होते. पदरखर्चाने इंधन, घरातूनच बनवून घेतलेले जेवण सोबत घेऊन फिरणारे कार्यकर्ते राजाभाऊंना खासदार बनवायचेच या इरेला पेटले होते. याच कार्यकर्त्यांची एकजूट कामाला आली. जनसामान्यांचे भाऊ अशी सिन्नरमध्ये ओळख असल्याने सिन्नरकर झटले. सिन्नरमधील माळी, वंजारी या प्रमुख व अन्य ओबीसी घटकांची ताकद वाजेंना बळ देवून गेली. सिन्नरमध्ये प्रभावी जनसंपर्क असल्याचा दावा गोडसे करत होते. मात्र त्यांचा संपर्क विशिष्ट कार्यकर्त्यांपुरताच मर्यादित राहिला.

तुमचा खासदार ... आमचा आमदार ....

वाजेंना लोकसभेचा मार्ग मोकळा झाला तर आमदारकीला कोकाटेंसाठी सोपे जाईल. याच विचारातून तुमचा खासदार... आमचा आमदार.. ही प्रचाराची टॅगलाईन सिन्नरमध्ये फिरवली. अपेक्षाप्रमाणे राजाभाऊंना मताधिक्य मिळाले त्यात कोकाटे समर्थकांचे योगदान लपून राहिलेले नाही. त्यामुळे येत्या काळात आमदारकीच्या निवडणुकीत राजाभाऊंच्या गटाकडे चेंडू राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT