Traffic congestion on major roads in the city. esakal
नाशिक

Traffic Problems : सिन्नरची वाहतूक कोंडी कोण फोडणार नागरिकांचे लक्ष; वाहनचालकांची कसरत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात जाण्यासाठी प्रमुख मार्ग असलेला खासदार पूल परिसरातील नाशिक वेस, लाल चौक, बाजार वेस, गणेश पेठ परिसरात वेळोवेळी सकाळ, दुपार, सायंकाळी वाहतूक कोंडी होऊन कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने सायंकाळनंतर वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. त्यामुळे ही कोंडी कोण फोडणार, याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या कोंडीत तासनतास अडकून पडावे लागत आहे. (Traffic Problems)

अनेक दुचाकी, चारचाकीचालक मनाला वाटेल त्या ठिकाणी वाहने उभी करुन निघून जात असल्याने येथून मार्ग काढताना इतर वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांना सकाळी व दुपारी शाळेत जाताना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यांना सायकलवर शाळेत जावे लागत असल्याने वाहतूक कोंडीत अडकल्याने शाळा व घरी जाण्यासाठी वेळ लागत असल्याने पालकही चिंता करतात.

त्यामुळे नगर परिषद व पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नाशिकवेस परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न नित्याचाच झालेला असताना येथून जवळ असलेल्या खासदार पूल परिसरातही वाहतूक कोंडीचा प्रश्‍न बिकट होत आहे. खासदार पुलापासून नाशिकवेस, गंगावेस, भाजीबाजार तसेच गणेश पेठकडे सहज जाता येते.

सध्या आडवा फाट्यापासून सरदवाडी रोडलगत अनेक उपनगरे वसली आहेत. त्यांना गावात येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे देवी रोड हाच आहे. शनिवार व रविवार हे दोन दिवस नाशिकवेस, गंगावेस परिसरात मोठा भाजीबाजार भरतो. शनिवारी माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतील कारखान्यांना सुट्टी असल्याने सर्व कामगार यादिवशी बाजारासाठी गर्दी करतात. (latest marathi news)

रविवारी सिन्नरचा आठवडे बाजार असल्याने यादिवशीही परिसरात गर्दी असते. खरेदीसाठी अनेक कारचालक, दुचाकीधारक खासदार पूल परिसरात वाटेल त्याठिकाणी वाहने उभी करतात. त्यामुळे इतर वाहनधारकांना तेथून मार्ग काढण्यास मोठी अडचण होते.

बेशिस्त पार्किंगचा मुद्दा ऐरणीवर

सिन्नर बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यांवर अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंना दुचाकी व चारचाकी वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरीकांना बेशिस्त वाहनांमुळे अडकून पडावे लागते. अनेकवेळा संबंधित विभागाला निवेदन देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. अशा या परिस्थितीत दिवसेंदिवस वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT