पंचवटी : नाशिक शहरालगत म्हसरूळ गावात पौराणिक महत्त्व अतिप्राचीन सिता सरोवराचे असलेले पौराणिक महत्त्व लयास जाण्याच्या मार्गावर दिसत आहे. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास व्हावा अशी, भक्त भाविकांसह म्हसरूळ ग्रामस्थांची मागणी आहे. (Nashik Sita Kunda Development expected Simhastha Kumbh Mela marathi news)
प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीला अनन्य साधारण असे पौराणिक महत्त्व आहे. गोदाघाट तपोवन आशेवाडी येथे वास्तव्य केल्याचे पुरावेही पुरातत्त्व विभागाकडे आहेत. तसेच शहरालगत म्हसरूळ गावातही पौराणिक महत्त्व अतिप्राचीन सिता सरोवर होय.
प्रभू श्रीरामरामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगत असताना त्याकाळी अरण्य होते. त्या वेळी फिरत-फिरत प्रभू श्रीरामरामचंद्र, सीता व लक्ष्मण आले होते. त्या वेळी सीतामातेस तहान लागली कुठेही पाणी मिळत नव्हते. श्रीरामानी बाण मारला व त्या ठिकाणी पाणी येऊ लागले.
त्यानंतर तेथे कुटीत राहून सदर पाण्याचा वापर पिण्यासाठी, स्नान व इतर कामासाठी वापर केला होता, अशी आख्यायिका आहे. कालांतराने ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी सीता सरोवर बांधले व त्यास बाजूस एक हौदही बांधला. कारण या सीता सरोवरास पौराणिक महत्त्व आहे.
त्याचे हनन न होता पाण्याचा वापर व्हावा असा मानस होता. तसेच ज्या ठिकाणी श्रीरामाची कुटी होती, त्या ठिकाणी राममंदिर बांधण्यात आले. ज्या वेळी नाशिक शहरात महापालिका स्थापन झाली. प्रथम पंचवार्षिकला या सिता सरोवराचा विकास करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले, की सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान प्रमुख आखाड्याचे साधू- महंत ध्वजारोहणपूर्वी ध्वज धुण्यासाठी सीताकुंडातील पाणी घेऊन जात असे तसेच स्नान करत असे. तसेच काही काळापूर्वी सीता सरोवर परिसरात पौष महिन्यांत यात्रा भरत असे.
परंतु आता हेच सिता सरोवराचे महत्त्व लोप पावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या परिसरात नेहमी अस्वच्छता दिसते आणि सीताकुंडात गाळ साचला आहे. मनपाने केलेले विकासकामांची दुरवस्था झाल्याचे दिसते. (Latest Marathi News)
सीता सरोवर कायम अस्वच्छ
अतिप्राचीन सिता सरोवरास अनन्य साधारण असे पौराणिक महत्त्व आहे. परंतु याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी नेहमीच कचऱ्याचे साम्राज्य दिसते. येथे होणारे दशक्रिया विधी वेळी कर्तन केलेले केस पडलेले असतात.
"श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिकनगरीत अनेक रामकालीन पाऊलखुणा आहेत, त्याचे संवर्धन करणे जतन करणे हे शासन आणि प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. सीता सरोवराची दुर्दशा पाहता सीता सरोवर पुनर्जीवित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सीता सरोवराचा समावेश केंद्र सरकारच्या रामायण सर्किट योजनेत करून त्याचे संवर्धन, पुनर्जीवन करून रामकालीन ठेव्याचे जतन करावे. सदर सरोवर अर्वाचिन असल्यामुळे केंद्रीय पुरातत्त्व विभागाने यात लक्ष देण्याची गरज आहे."- देवांग जानी, सामाजिक कार्यकर्ते
"म्हसरूळ ग्रामस्थांचे पौराणिक श्रीक्षेत्र सिता सरोवराचे रामायण सर्किट माध्यमातून सुशोभीकरण लवकरात लवकर व्हावे. आज या धार्मिक प्रेक्षणीय स्थळाची होणारी दुरवस्था व येथे होणाऱ्या मांस-मद्यसेवन पार्ट्या बंद होतील. पूर्वी सिता सरोवराचे पवित्र जपले जात होते. तेच यापुढे टिकवण्यासाठी आम्ही ग्रामस्थ अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत असताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे."- विश्वास मोराडे, ग्रामस्थ, म्हसरूळ
"सीता सरोवर येथे सद्यःस्थितीत सभामंडपाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात शासन दरबारी व आमदारांच्या माध्यमातून सीता सरोवरचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असून या ठिकाणी असलेल्या तांत्रिक अडचणी सोडण्याचा प्रयत्न करणार आहे."- अरुण पवार, माजी गटनेते तथा माजी नगरसेवक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.