Teachers Constituency Election esakal
नाशिक

Nashik Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघात साडेसोळा हजार मतदारांची भर

Nashik News : शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यावर मतदान नोंदणीला प्रचंड वेग आल्याने २०१८ च्या तुलनेत तब्बल साडेसोळा हजार मतदारांची वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यावर मतदान नोंदणीला प्रचंड वेग आल्याने २०१८ च्या तुलनेत तब्बल साडेसोळा हजार मतदारांची वाढ झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत अंतिम मतदारांची यादी घोषित झाली असून, त्यात साडेपाच हजार मतदारांच्या नोंदणीचा अर्ज निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आल्याने त्यांचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. (Sixteen thousand voters added to teachers constituency)

त्यावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येईल. नाशिक विभागात एकूण ७० हजारांवर मतदार होऊ शकतात. शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवार (ता. ३१)पासून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. ७ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्याने लोकसभा निवडणुकीचा गुलाल उधळल्यावरच निवडणुकीत खरी रंगत येईल.

त्यादृष्टीने महायुती, महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरवात केलेली दिसून येते. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावतात. त्यामुळे जास्तीत जास्त मतदार आपल्या जिल्ह्यातील कसे राहतील, याकडे उमेदवारांचा कल असतो. मतदार नोंदणीसाठी मंगळवार (ता. २८)पर्यंत अंतिम मुदत होती.

नाशिक जिल्ह्यात २३ हजार ५९७ मतदारांची नावे अंतिम झाली आहेत. दोन हजार १८३ मतदारांचे अर्ज अंतिम निर्णयासाठी प्रलंबित आहेत. धुळ्यात आठ हजार ८८ मतदारांचे नाव अंतिम यादीत समाविष्ट असून, ८० अर्ज प्रलंबित आहेत. जळगावमध्ये १३ हजार ५६ शिक्षकांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट आहेत. येथील ५८ शिक्षकांच्या अर्जावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. (latest marathi news)

तसेच, नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार ४१९ मतदार असून, १०३ शिक्षकांच्या अर्जावर अंतिम निर्णय व्हायचा आहे. सर्वाधिक मतदार नाशिक जिल्ह्यात असल्याने सर्वाधिक उमेदवारही याच जिल्ह्यात राहण्याची शक्यता दिसून येते. अहमदनगर जिल्ह्यात १४ हजार ६९२ मतदारांची नावे यादीत समाविष्ट झालेली आहेत.

पण, अंतिम टप्प्यात मतदारांची नोंदणी करण्यात अहमदनगरने आघाडी घेतलेली दिसून येते. या जिल्ह्यात तीन हजार ११५ मतदारांचे अर्ज निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. नाशिकपाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यात मतदारांची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी उमेदवारांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता वाढली आहे.

अंतिम टप्प्यात अहमदनगरची आघाडी

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित झाल्यावर अहमदनगर जिल्ह्यातील इच्छुकांची संख्याही अचानकपणे वाढली आहे. या जिल्ह्यात मतदार नोंदणीच्या अंतिम टप्प्यात मतदारांची संख्याही कमालीची वाढली. एका संस्थेतील एकगठ्ठा मतदान संस्था चालकांकडून नोंदविल्याचे बोलले जाते. त्यामुळे तीन हजारांवर मतदारांचे अर्ज नोंदणीसाठी प्रलंबित आहेत. त्यांच्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विभागातील मतदार

जिल्हा................२०१८.............२०२४..........प्रलंबित अर्ज

नाशिक...........१४,८७३.............२३,५९७.........२,१८३

धुळे...............८,२५६...................८,०८८..............८०

जळगाव........१२,०५६.................१३,०५६...........५८

नंदुरबार.........५,२६८..................५,४१९.............१०३

अहमदनगर....१३,४३९................१४,६९२..........३,११५

एकूण.............५३,८९२................६४,८०२...........५,५३९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT