Adv. Nitin Thackeray, General Secretary, MVP esakal
नाशिक

Nashik News : मविप्र स्‍वयंसहाय्यता विद्यापीठातून मिळणार कौशल्‍याधिष्ठित शिक्षण

Nashik : मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेची विद्यापीठ स्‍थापनेच्‍या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेची विद्यापीठ स्‍थापनेच्‍या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. संस्‍थेतर्फे ‘मविप्र स्‍वयंसहाय्यता विद्यापीठ’ स्‍थापनेसंदर्भातील प्रस्‍ताव शासनाला सादर झाला आहे. त्‍यास मान्‍यता मिळाल्‍यानंतर व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत शिक्षणक्रम उपलब्‍ध केले जाणार आहेत. प्रामुख्याने कौशल्‍याधिष्ठित शिक्षणक्रमांवर भर दिला जाणार आहे. (Nashik Skill education marathi news )

‘मविप्र’च्या ‍गंगापूर रोडवरील उदाजी मराठा बोर्डिंग कॅम्‍पसमध्ये २५ एकर जागेत प्रस्‍तावित विद्यापीठाला सुरवात होणार आहे. यापूर्वीच संस्‍थेच्‍या कार्यकारिणीकडून वर्षपूर्ती झाल्‍यानंतर घेतलेल्‍या आढाव्‍यादरम्‍यान आगामी ध्येय-धोरणांची मांडणी केली होती. यात ‘मविप्र’ विद्यापीठाची स्‍थापना केली जाणार असल्‍याचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी जाहीर केले होते.

त्‍यानुसार शासनास विद्यापीठ स्‍थापनेसंदर्भातील प्रस्‍ताव सादर करण्यात आला आहे. त्‍यास मान्‍यता मिळाल्‍यानंतर विद्यापीठ कायदा पारित केला जाणार असून, इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासूनच शिक्षणक्रम सुरू करण्याचा प्रयत्‍न असून, आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण झाल्‍यास येत्‍या शैक्षणिक वर्षापासूनच शिक्षणक्रमांना सुरवात केली जाणार असल्‍याचे समजते. (latest marathi news)

टेलरमेड कोर्सेसवर भर

मविप्र स्‍वयंसहाय्यता विद्यापीठामार्फत अभियांत्रिकी, व्‍यवस्‍थापनशास्‍त्र शाखेतील पदवी, पदव्‍युत्तर पदवी ते थेट डॉक्‍टरेट (पीएच. डी.) पर्यंत शिक्षणक्रम राबविले जाणार आहेत. औद्योगिक कंपन्‍यांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता ओळखून अभ्यासक्रमांची रचना केली जाणार आहे. त्‍यासाठी औद्योगिक कंपन्यांशी सामंजस्‍य करारही केले जाणार असून, प्राथमिक स्‍तरावर काही कंपन्‍यांशी चर्चा झाली आहे.

सध्याची महाविद्यालये राहणार कायम ‘मविप्र’ संस्थेअंतर्गत सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्‍न विविध पारंपरिक, व्‍यावसायिक महाविद्यालये आहेत. ही महाविद्यालये तशीच कायम राहणार आहेत व विद्यापीठ स्वतंत्ररीत्या स्‍थापन केले जाणार आहे. त्‍यामुळे सध्या दोन लाखांहून अधिक असलेला संस्‍थेचा विद्यार्थी परिवार भविष्यात आणखी वाढणार आहे.

''सध्याचे महाविद्यालय व इतर शाखा आहे तशाच ठेवून स्‍वतंत्र स्वरूपाच्या ‘मविप्र’ स्‍वयंसहाय्यता विद्यापीठाच्‍या मान्‍यतेसाठी प्रस्‍ताव सादर केला आहे. त्याला मान्‍यता मिळाल्‍यास तातडीने विद्यापीठाद्वारे टेलमेड कोर्स उपलब्‍ध करून देत रोजगारक्षम युवक घडविला जाईल. त्‍यासाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्‍तरावरील फॅकल्‍टी उपलब्‍ध केली जाईल. कंपन्‍यांच्‍या सामंजस्‍याने अभ्यासक्रमांची रचना केली जाणार असल्‍याने विद्यार्थ्यांना त्‍याचा फायदाच हहोणार आहे.''- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT