Meri Rasbihari link road digging roads esakal
नाशिक

Nashik Smart City : स्मार्ट सिटी रस्ते खोदकाम ठरताय अपघातास कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या काही वर्षांपासून शहरासह परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे होत आहेत. यामुळे नाशिककर त्रस्त असताना रासबिहारी लिंक रोडवरील बळी मंदिर परिसरात पक्का रस्ता गेल्या दहा बारा दिवसांपासून खोदून ठेवल्याने अनेक अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. (Smart city road digging leading to accidents)

यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्मार्ट सिटीकडून मेरी-रासबिहारी लिंक रोड गेल्या १० ते १२ दिवसांपासून विकासकामांसाठी खोदून ठेवला आहे. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा असून स्मार्ट सिटीने रस्ता खोदल्यानंतर काम पूर्ण होऊनही त्यावर डांबरीकरण केले नाही.

वाहने ये-जा करून याठिकाणी खड्डा पडल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. रविवारी (ता.२६) सकाळी याबाबत नागरिकांनी परिसरातील लोकप्रतिनिधी माजी नगरसेविका प्रियांका माने यांना विचारणा केली. त्यानंतर माने यांनी मनपा अधिकारी यांना फोनवरून विचारणा केली. त्यावर संबंधित अधिकारी यांनी सांगितले की, हे काम मनपा प्रशासनाचे नसून स्मार्ट सिटीचे आहे.

त्यावर स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे नगरसेविका माने यांनी सांगितले. स्मार्ट सिटीने नागरिकांना जीवे मारण्याचे लायसन्स घेतल्याचा गंभीर आरोप माने यांनी करीत, खोदलेला हा रस्ता तत्काळ पूर्वीसारखा करण्याची अपेक्षा व्यक्त केली. (latest marathi news)

सीईओंना पाठविला मेसेज

अमृताधाम चौफुली व बळी महाराज मंदिर चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबतही असाच चालढकलपणा करत असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. नागरिकांचा मृत्यू होऊ नये म्हणून आपण हा विषय लवकरात लवकर मार्गी लावा, अशा विनंतीचा मेसेज स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे यांना पाठवल्याचे भाजपचे शहर उपाध्यक्ष धनंजय माने यांनी सांगितले.

"नाशिक शहरासह पंचवटी विभागात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांमध्ये रासबिहारी लिंकरोड खोदल्याने तत्काळ दुरुस्त करून पूर्ववत करावा. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करू. खोदकामामुळे वाहनधारक अपघातग्रस्त होत आहेत. कोणाचा जीव गेल्यास स्मार्टसिटी प्रशासनाला जबाबदार धरले जाईल." - प्रियांका माने, माजी नगरसेविका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT