The arrival of new soybeans of the season has started at the sub-market yard in Manori and Deepak Sable during the puja. esakal
नाशिक

Nashik Soybean News : मानोरीत सोयाबिनची आवक, 4900 पर्यत भाव! नगर जिल्ह्यातील शेतकरीही येऊ लागले, भुसार मालालाही चांगला भाव

Latest Agriculture News : सदर खरेदी-विक्री केंद्रास पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांसह व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार या खरेदी-विक्री केंद्रावर हंगामातील नविन सोयाबीन, मका व मूग या शेतीमालाची आवक सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : येथील बाजार समितीच्या मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्रावर या हंगामातील नविन सोयाबीनची आवक सुरू झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली. (Soybean arrival in Manori)

जिल्ह्यातील निफाड, येवला व सिन्नर तालुक्यासह नगर जिल्ह्यातील कोपरगाव व राहुरी तालुक्यातील गावांमध्ये शेतकरी बांधवांनी भुसार व तेलबिया शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांची सोय व्हावी म्हणून बाजार समितीने मानोरी खुर्द तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर १४ नोव्हेंबरपासून भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू केलेले आहे. सदर खरेदी-विक्री केंद्रास पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांसह व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार या खरेदी-विक्री केंद्रावर हंगामातील नविन सोयाबीन, मका व मूग या शेतीमालाची आवक सुरू झाली आहे.

शुक्रवारी (ता.२०) मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्रावर या हंगामातील नविन सोयाबीनचे विधिवत पूजन मानोरी खुर्द व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक साबळे यांचे उपस्थितीत प्रसिध्द व्यापारी शिवाजी साबळे व ज्येष्ठ शेतकरी शिवाजी वावधाने यांच्या हस्ते करण्यात आले. मुहूर्तावर मानोरी खुर्द येथील शेतकरी शिवाजी तुकाराम वावधाने यांच्या सोयाबीनला चार हजार नऊशे रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. किरण बाळासाहेब चव्हाण यांनी तो खरेदी केला.

शुभारंभ प्रसंगी श्री. साबळे यांनी मनोगत व्यक्त करताना लासलगाव बाजार समिती कांदा, मका, सोयाबीन, गहू, बाजरी, हरभरा, टोमॅटो, डाळींब, द्राक्षमणी व सर्व प्रकारच्या फळे व भाजीपाल्यासाठी आशिया खंडात प्रसिध्द अशी बाजारपेठ आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना जवळपास शेतीमाल विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीने ठिकठिकाणी बाजार आवार व खरेदी-विक्री केंद्र सुरू केले आहे. (latest marathi news)

परिसरातील शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेल्या शेतीमालास स्पर्धात्मक बाजारभाव मिळावा म्हणून शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल परस्पर शिवार खरेदीद्वारे विक्री न करता योग्य प्रतवारी करून बाजार समितीच्या मानोरी खुर्द येथील खरेदी-विक्री केंद्रावरच विक्रीसाठी आणावा असे आवाहन केले.

शुक्रवारी (ता.२०) मानोरी खुर्द खरेदी-विक्रीवर ८ वाहनातून १३५ क्विंटल सोयाबीनची, प्रत्येकी १-१ वाहनातून १० क्विंटल गहू व ३ क्विंटल मूगाची विक्री झाली. मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी संदीप निकम, सहाय्यक रामदास गायकवाड, धान्य अडते / व्यापारी दिगंबर गुंजाळ, सुभाष शिंदे, दिनेश लोहारकर, नामदेव वाळुंज, निखिल घाडगे, किरण चव्हाण, विजय शेळके, सुरेश मोरे, ईश्वर शिंदे, शांताराम उल्हाळे, योगेश जाधव, कृष्णा कहांडळ, वसंत वावधाने, सचिन पोमनर, योगेश बागल, दीपक नेवगे, यादव शेळके, वैभव शेळके, शुभम पायमोडे, योगेश जाधव, साहेबराव नागरे, सुनील आव्हाड आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

SCROLL FOR NEXT