Police Transfer sakal
नाशिक

Nashik Police Transfer : परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले आदेश

Police Transfer : स्वजिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या परजिल्ह्यात बदल्या करण्याचे आदेश असतानाही काही अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर नियुक्ती केल्याचे निदर्शनास आले होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच जिल्ह्यात तीन वर्षे व स्वजिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची परजिल्ह्यात बदल्या करण्याचे आदेश असतानाही काही अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर नियुक्ती केल्याचे निदर्शनास आले होते. त्याची गंभीर दखल घेत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांनी परिक्षेत्रातील अशारितीने नियुक्त केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या परजिल्ह्यात बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. (Nashik Police Transfer marathi news)

आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यासाठी तीन वर्षे एका जिल्ह्यात सेवा केलेले आणि स्वजिल्हा असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश होते.

परंतु काही जिल्ह्यांमध्ये स्वजिल्हा व एकाच जिल्ह्यात तीन वर्षे होऊनही त्या अधिकाऱ्यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती करीत पळवाट काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, सदरची बाब नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी परिक्षेत्रातील १४ पोलिस निरीक्षकांच्या परजिल्ह्यात बदल्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्याही बदल्या केल्या आहेत.

पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, विजय करे, राजेंद्र कुटे, रविंद्र मगर, जयपाल हिरे, ज्ञानेश्वर जाधव, दीपक बुधवंत, भरत जाधव, अशोक पवार, बापूसाहेब महाजन, श्याम निकम, पांडुरंग पवार, शिल्पा पाटील, अजय वसावे या चौदा अधिकाऱ्यांची अहमदनगर ते नाशिक, नाशिक ग्रामीण ते जळगाव, धुळे, नंदूरबार, जळगाव ते धुळे, नाशिक अशा बदल्या केल्या आहेत.

त्याचप्रमाणे, सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, रामचंद्र कर्पे, राजू लोखंडे, युवराज आठरे, महेश येसेकर, गणे वारुळे, शिवाजी तांबे, एकनाथ ढोबळे, मयूर भामरे, वर्षा जाधव, नरेंद्र साबळे, योगिता नारखेडे, राजेश गावित यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

उपनिरीक्षकांच्या बदल्या

गजेंद्र इंगळे, अश्विनी मोरे, युवराज चव्हाण, योगेश चाहरे, श्रीकांत डांगे, शैलेंन्द्र जावळे, अनिल भारती, कैलास कपिले, अश्विनी टीळे, चंद्रभान जाधव, रामकृष्ण जगताप, अशोक मोकळ, विजय गायकवाड, पांडुरंग कावळे, बबन पाटोळे, रमेश पाटील, विक्रांत कचरे, चंद्रकांत दवंगे, विनोद परदेशी, संजय विधाते, सुकदेव धरम, महेश शिंदे, गोपाळ देशमुख, रुपाली महाजन, दीपाली पाटील, मसलोद्दीन शेख, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, गंभीर शिंदे, कैलास दामोदर, जयेश गांगुर्डे, प्रिया वसावे या उपनिरीक्षकपदी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT