Junior College Admission  esakal
नाशिक

Junior College Admission : अकरावी प्रवेशिकेची आजपासून विशेष फेरी!

Nashik News : गेल्या दोन महिन्यांपासून इयत्ता अकरावी प्रवेशासाठी नियमित तीन फेऱ्या पार पडल्या. आतापर्यंत १० हजार ६९१ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अद्याप १७ हजार ५८९ जागा रिक्त आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या दोन महिन्यांपासून इयत्ता अकरावी प्रवेशासाठी नियमित तीन फेऱ्या पार पडल्या. आतापर्यंत १० हजार ६९१ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अद्याप १७ हजार ५८९ जागा रिक्त आहे. त्यासाठी आज (ता. २६) पासून विशेष फेरी राबविण्यात येत आहे. या रिक्त जागा विशेष फेरीतून भरण्याचे नियोजन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे. (Special round of eleventh admission from today)

‘विशेष फेरी-१’ची गुणवत्ता यादी येत्या ५ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीत निवड झालेल्या विदयार्थ्यांना ८ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहे तर ८ ऑगस्टला रात्री ८ वाजेपर्यंत कोट्यातील रिक्त जागा ‘कॅप’ कडे प्रत्यार्पित केल्या जाणार आहे.

शहरातल्या ६९ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या २८ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी कॅपच्या १५ हजार ३३२ तर कोटाच्या २ हजार २५७ रिक्त जागांसाठी विशेष फेरी-१ चे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. (latest marathi news)

त्यानुसार येत्या बुधवार (ता.३१) पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. १ ते ४ ऑगस्ट या कालावधीत पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे तसेच विभागीय कॅप समित्यांकडून अलॉटमेंटचे पूर्वपरीक्षण केले जाणार आहे. दरम्यान, याच कालावधीत कॅपप्रमाणे कोटांतर्गत प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT