Nashik News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विशेष रेल्वे चालविणार आहे. मुंबई एलटीटी-बनारस (०१०५३) साप्ताहिक विशेष गाडीच्या १३ फेऱ्या होतील. ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत दर बुधवारी एलटीटीहून १२. १५ वाजता गाडी सुटेल. बनारस- एलटीटी (०१०५४) गाडी ४ एप्रिल ते २७ जूनपर्यंत दर गुरुवारी बनारस येथून ८.३० वाजता सुटेल. कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, वाराणसी आदी ठिकाणी गाडी थांबेल. (Nashik Special weekly trains due to rush of passengers)
एलटीटी-दानापूर (०१४०९) द्विसाप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्या होतील. मुंबई एलटीटीहून १ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर सोमवारी आणि शनिवारी ही गाडी १२.१५ वाजता सुटेल. दानापूर- एलटीटी द्विसाप्ताहिक विशेष (०१४१०) गाडी २ एप्रिल ते ३० जूनपर्यंत मंगळवार आणि रविवारी दानापूर येथून ६. १५ वाजता सुटेल.
कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खांडवा आदी ठिकाणी ती थांबेल. एलटीटी-समस्तीपूर साप्ताहिक विशेष (०१०४३) गाडीच्या तेरा फेऱ्या होतील. ही गाडी ४ एप्रिल ते २७ जूनपर्यंत प्रत्येक गुरुवारी एलटीटीहून १२.१५ वाजता सुटेल. समस्तीपूर-एलटीटी (०१०४४) गाडी ५ एप्रिल ते २८ जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी समस्तीपूर येथून ११. २० वाजता सुटेल.
कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खांडवा, इटारसी, पाटलीपुत्र आदी ठिकाणी ती थांबेल. एलटीटी-प्रयागराज साप्ताहिक विशेष (०१०४५) गाडीच्या तेरा फेऱ्या होतील. २ एप्रिल ते २५ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी ती एलटीटीहून १२.१५ वाजता सुटेल. (latest marathi news)
प्रयागराज - एलटीटी(०१०४६) गाडी ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत दर बुधवारी प्रयागराज येथून ६. ५० वाजता सुटेल. कल्याण, नाशिक, भुसावळ, खांडवा, इटारसी आदी ठिकाण ती थांबेल. एलटीटी-गोरखपूर साप्ताहिक विशेष (०११२३) गाडीच्या तेरा फेऱ्या होतील.
एलटीटीहून ५ एप्रिल ते २८ जूनपर्यंत दर शुक्रवारी १२.१५ वाजता सुटेल. गोरखपूर - एलटीटी(०११२४) गाडी ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर शनिवारी गोरखपूर येथून ९.१५ वाजता सुटेल ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ आदी ठिकाणी ती थांबेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.