Nashik News : अभोणा ते कळवण रस्त्यावरील दह्याणे फाट्यालगत चुनभट्टी नाल्यावरील जीर्ण अवस्थेतील पूल व पाळे फाट्यावरील पुलाच्या दुरावस्थेबाबत दैनिक सकाळने वृत्त प्रसिद्ध करताच या कामांना वेग आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास सुखाचा होणार आहे. चुनाभट्टी नाल्यावरील पूल पुर्णतः मोडकळीस आला होता. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. (nashik Speed up bridge works on Abhona Kalwan road marathi news)
पुलाची उंची कमी असल्याने व अभोणा-कळवण दोन्ही बाजूने उतार, वळण असल्याने पावसाचे पाणी पुलावरच साचून मोठे खड्डे पडले होते. तीव्र उतार व वळणामुळे काही अपघातही झाले होते. तसेच, पाळे फाटा येथील नाल्यावरील पूलदेखील मोडकळीस आला होता. त्यामुळे या परिसरातील वाहतूक वळविण्यात आल्याने बसने येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. दोन्ही पुलांच्या दुरुस्तीबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर दोन्ही पुलांच्या कामांना वेग आला आहे. (latest marathi news)
अवजड वाहतुकीचा प्रश्न सुटणार
या दोन्ही पुलांवरून तालुका व तालुक्याबाहेरील शेतमाल विक्रीसाठी जाणारी अवजड वाहने, दोन्ही बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येणारी वाहने, विविध शैक्षणिक संस्थाच्या स्कुल बस, सापुताराकडे जाणाऱ्या पर्यटकांची वाहतूक सुरक्षित व सुरळीत होणार आहे. शिवाय अभोणा-कळवण रस्त्यावर अनेक कांदा व्यापारी व उत्पादक शेतकऱ्यांचे कांद्याचे शेड असून, रस्त्यालगत भुईकाटेही आहेत. त्यामुळे मालवाहतूक सोयीची होणार आहे.
अभोणा-कळवण रस्त्यावर दोन धोकेदायक पुलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे परिसरातील वाहनधारकांनी केली होती. दैनिक सकाळनेही याबाबत प्रसिद्धी देऊन पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने दोन नवीन पुलांचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेत आणणे सोयीचे होणार आहे.''- गिरीश देवरे, कांदा उत्पादक, दह्याणे (पाळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.