Lavanya Lodhe from Kakani Kanya Vidyalaya in Malegaon was the first to come to the city and taluka esakal
नाशिक

SSC Exam Result : मालेगाव तालुक्याचा निकाल 95.28 टक्के

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून शहर व परिसरातील शाळांमध्ये यंदाही मुलीच वरचढ ठरल्या आहेत. मालेगाव तालुक्याचा निकाल ९५.२८ टक्के तर शहराचा निकाल ९०.६१ टक्के इतका लागला आहे. शहरातील काकाणी कन्या विद्यालयातील लावण्या लोधे ही ९९.४० गुण घेऊन सर्वप्रथम आली आहे. शहरातील ५२ शाळांतील ८ हजार ९३० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. (SSC result of Malegaon taluka is 95 percent)

विशेष श्रेणीत ३ हजार ४० तर प्रथम श्रेणीत दोन हजार ४९३, द्वितीय श्रेणीत एक हजार ९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ८ हजार ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील ९७ शाळांमधील ५ हजार ६०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विशेष श्रेणीत २ हजार ८७६, प्रथम श्रेणीत १ हजार ८०७, द्वितीय श्रेणीत ५८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

५ हजार ३३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील ९७ शाळांमधील ३५ शाळांचा निकाल शंभर टक्के तर ४४ शाळा ९० टक्क्याहून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले असले तरी ७० टक्के पेक्षा कमी निकालाच्या दोन शाळा आहेत. (latest marathi news)

शहरी भागातील ५२ शाळा असून फक्त पाच शाळांचा शंभर टक्के निकाल लागला. २७ शाळांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक आहे. ७० टक्के आतील दोन शाळा आहेत. सर्वात कमी निकाल जमहूर हायस्कूल ५३.६१ टक्के व जमीम हायस्कूल ३७.२० टक्के या शाळांचा लागला आहे.

वैद्यकीय शिक्षण घेणार...

लावण्या ही मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. रूं. झु. काकाणी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी आहे. ती शासकीय रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक विलास लोधे व वडेल येथील जिल्हा परिषद शिक्षिका नलिनी सांगळे यांची कन्या आहे. लावण्या हिला चित्रकला, संगीत, वाचन व सामान्य ज्ञानात आवड आहे. वक्तृत्व स्पर्धा गाजवते. भविष्यात विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन वैद्यकीय पदवी घेऊन जनसामान्यांची सेवा करण्याचा मानस आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र दशपुते व पदाधिकारी यांनी तिच्या यशाबद्दल कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT