state government has announced subsidy of Rs 5 per liter to milk producers  esakal
नाशिक

Milk Producer : राज्यातील दूध उत्पादकांना 540 कोटींची आवश्‍यकता! दुग्धविकास विभागाची तरतूद

Nashik News : आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्यामुळे दुधाचे दर कमालीचे घसरलेले असताना दूध उत्पादकांना पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्यामुळे दुधाचे दर कमालीचे घसरलेले असताना दूध उत्पादकांना पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच दुधाची भुकटी निर्यातदारांना प्रतिकिलो ३० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी ५४० कोटी इतक्या अनुदानाची आवश्‍यकता आहे. (state government has announced subsidy of Rs 5 per liter to milk producers while prices of milk have fallen)

त्यासाठी नाशिक विभागातील एक लाख ३० हजार दूध उत्पादक पात्र ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत रोज १२० लाख लिटर दुधाचे संकलन होते. त्यानुसार दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे ५४० कोटी इतक्या अनुदानाची आवश्‍यकता आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीत अनुदानाचे नऊ टप्प्यांत वाटप करण्यात येणार आहे.

यासंदर्भात दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रिमंडळाची मान्यता घेतल्यानंतर ५ जुलै २०२४ ला कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाने अनुदान वाटपाचा शासन निर्णय जारी केला. नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, जळगाव.

धुळे व नंदुरबार येथील एक लाख २९ हजार शेतकऱ्यांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत पहिल्या टप्प्यातील ७७ कोटी ४९ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यात आता नव्याने घोषणा झाल्यामुळे साधारणत: तेवढ्याच प्रमाणात अनुदानवाटप वितरित होण्याची शक्यता वर्तवली जाते. दूध भुकटी निर्यातदारांनाही ३० रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. (latest marathi news)

राज्यातील साधारणत: १५ हजार टन दूध भुकटीसाठी ४५ कोटी रुपये देय राहणार आहे. त्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांनी दुग्धविकास आयुक्तांकडे अर्ज करणे बंधनकारक आहे. दुग्ध व्यावसायिकांचे ऑनलाइन अर्ज भरणाऱ्या व्यक्तींना ०.५ पैसे दराने सुमारे पाच कोटी ४० लाख रुपये दिले जाणार असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

"दूध उत्पादकांना अनुदान देण्यासंदर्भात शासन निर्णय प्राप्त झाला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल. जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे."- श्रीकांत शिरपूरकर, प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT