NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik NMC News : महापालिका घराघरांतून शोधणार प्लॅस्टिक! शासनाच्या कानपिचक्या

Nashik News : राज्य शासनाने वाढत्या प्लॅस्टिक वापराकडे लक्ष वेधत महापालिकेला कानपिचक्या देताना प्लॅस्टिक कारवाई फक्त पिशव्या पकडण्यापुरती न मर्यादित न ठेवता व्याप्ती वाढविण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात प्लॅस्टिक वापरकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने प्लॅस्टिक वापर नियंत्रणात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी राज्य शासनाने वाढत्या प्लॅस्टिक वापराकडे लक्ष वेधत महापालिकेला कानपिचक्या देताना प्लॅस्टिक कारवाई फक्त पिशव्या पकडण्यापुरती न मर्यादित न ठेवता व्याप्ती वाढविण्याच्या सूचना दिल्या. (Nashik NMC News)

त्यामुळे आता पिशव्यांबरोबरचं १२ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक शोधमोहीम सुरू केली जाणार असून, आइस्क्रीम कपपासून ते घराघरांतील स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक चमचेदेखील जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक)

अधिसूचना-२०१८ नुसार महापालिकेने १ एप्रिल २०१८ पासून शहरात प्लॅस्टिक बंदी लागू केली आहे. प्लॅस्टिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने पथकांची नियुक्ती केली आहे. पथकाच्या माध्यमातून प्लॅस्टिक वापरणाऱ्यांच्या दुकानावर छापा टाकून दंडात्मक कारवाई केली जाते.

मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असली तरी प्रत्यक्षात शहरात मोठ्या प्रमाणात १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या पर्यावरण विभागाचे अपर सचिव प्रवीण दराडे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील महापालिकांचा आढावा घेतला. (latest marathi news)

त्यात नाशिक महापालिकेची कामगिरी समाधानकारक दिसून आली. परंतु प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता व्याप्ती वाढवून ज्या घटकांवर प्लॅस्टिकचा वापर होतो. तेथेदेखील छापा टाकून जप्तीची कारवाईच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाकडून प्लॅस्टिक जप्तीची कारवाई तीव्र केली जाणार आहे.

कारवाईत याचा समावेश

प्लॅस्टिक पिशव्यांबरोबरच आइस्क्रीम, ध्वज, फुगा व कँडीसाठी वापरत असलेल्या प्लॅस्टिकच्या काड्या सजावटीसाठी वापरण्यात येणारा थर्माकोल त्याचप्रमाणे प्लेट्स, ग्लासेस, कटलरी, काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटच्या पॅकेटवरील प्लॅस्टिक रॅपचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

प्रतिदिन ३० टन प्लॅस्टिक कचरा

घंटागाडीच्या माध्यमातून विल्होळी खत डेपो प्रकल्पात जवळपास तीस टन प्लॅस्टिक कचरा संकलित केला जातो. प्लॅस्टिकवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आहे. खत प्रकल्पावर घनकचऱ्याचे संकलन केल्यानंतर बॅलेस्टीक सेपरेटरमध्ये कचरा टाकला जातो. तेथे प्लॅस्टिक व अन्य घटक वेगळे केले जातात. त्यातून प्लॅस्टिक वापर वाढल्याचे दिसून येते. प्रतिदिन ३० टनापेक्षा अधिक प्लॅस्टिक कचरा बाजूला पडतो.

प्लॅस्टिक झोनमधूनच अधिक कचरा

महापालिका हद्दीतील गोदावरी नदीच्या १९ किलोमीटरच्या हद्दीत दोन्ही बाजूने नदीकाठपासून १०० मीटर परिसर नो प्लॅस्टिक झोन आहे. मात्र याच भागात अधिक प्लॅस्टिक कचरा आढळतो.

१९०० किलो प्लॅस्टिक जप्ती

गेल्या वर्षभरात प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक पिशव्या तसेच वस्तूंचा साठा, विक्री व वापर करणाऱ्या २७८ जणांवर कारवाई करण्यात आली असून, १४.८५ लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. या कारवाईत १,८८५ किलो प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. एप्रिल व मे २०२४ या कालावधीत एकूण ५० केसेस करण्यात आल्या असून, दोन लाख ५५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आले.

प्लॅस्टिक बंदीसाठी महापालिकेची कार्यवाही

- प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय विशेष

पथके.

- एका विभागात तीन पथके एकूण अठरा पथके तपासणी करणार.

- दोषींवर दंडात्मक कारवाई

- प्लॅस्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी फलकांची उभारणी

- एकल प्लॅस्टिकचा वापर होणार नाही याची खबरदारी घेणार

"सिंगल युज प्लॅस्टिकवर शासनाने बंदी घातली असून अशा प्रतिबंधित वस्तूंचा साठा, विक्री व वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना आहेत. दुधासाठीदेखील किटली सोबत न्यावी. प्लॅस्टिक पिशव्यांचा आग्रह धरू नये." - डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT