Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पराभव भारतीय जनता पक्षाच्या जिव्हारी लागला असून, अति सुरक्षित असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात विजयाची संधी असतानाही पराभव झाल्याने तातडीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचा अहवाल मागवून झाडाझडती सुरू केली आहे. (Nashik Lok Sabha Election)
नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरातील पूर्व, पश्चिम व मध्य या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. सिन्नर व देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असले, तरी त्यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेसकडेच अधिक आहे.
सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे असतानाही मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. विशेष म्हणजे सिन्नर व इगतपुरी या ग्रामीण मतदारसंघांसह शहरातील मतदारसंघातही मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत लीड कमी झाला, ही बाबही भाजपच्या आमदारांच्या दृष्टीने धोकादायक मानली जात आहे.
एकंदरीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करणारा अहवालच पक्षश्रेष्ठींनी महानगरप्रमुख व जिल्हाप्रमुखांकडून मागविला. त्यात पराभवाची नेमकी कारणे, महायुतीच्या उमेदवाराबद्दल मत याची सविस्तर माहिती मागविली. (latest marathi news)
तातडीने अहवाल रवाना
भाजपच्या प्रदेश कार्यालयाला तातडीने अहवाल पाठविण्यात आला असून, विद्यमान खासदारांबद्दल असलेली अँटी इन्कबन्सी, विरोधकांकडून खुद्दार व गद्दार असा झालेला प्रभावी प्रचार, उमेदवारी जाहीर करण्यास झालेला विलंब, शिवसेनेची शहर व ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची फळी होती का? आदी बाबींची सविस्तर माहिती प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.
"नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवाला कारणीभूत ठरलेले मुद्दे पक्षषष्ठींकडे अहवालाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत." - प्रशांत जाधव, शहराध्यक्ष, भाजप, नाशिक
विधानसभानिहाय विजयी उमेदवाराला मिळालेला लीड
विधानसभा मतदारसंघ मिळालेला लीड
सिन्नर १ लाख २८ हजार २३८
पूर्व १० हजार ४०० मतांनी पिछाडी
मध्य ३ हजार ८०६ मतांची आघाडी
पश्चिम ३१ हजार २१० मतांची पिछाडी
देवळाली २७ हजार १३६ मतांची आघाडी
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर ४३ हजार ५३३ मतांची आघाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.