Speaking at the honor yatra of NCP, state president Kha. Sunil Tatkare. Officials and activists present on the platform. esakal
नाशिक

NCP Sunil Tatkare : जनतेचे व्यापक हित जपत विकासाचा निर्णय : प्रदेशाध्यक्ष तटकरे

Sunil Tatkare : जनतेचे व्यापक हित जपत राज्याचा विकास करण्याचा निर्णय आपण सर्वांनी घेतला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

NCP Sunil Tatkare : शेतकरी हित व विकासासाठी सत्तेत राहणे तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झालो आहोत. जनतेचे व्यापक हित जपत राज्याचा विकास करण्याचा निर्णय आपण सर्वांनी घेतला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. येथील राधाकृष्ण लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सन्मान यात्रा सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. (State President Sunil Tatkare Decision of development while preserving broad interests of people)

महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, ज्येष्ठनेते अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठनेते अरुण थोरात आदी प्रमुख उपस्थित होते. श्री. तटकरे म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वावरत आहे.

स्व.यशवंतराव चव्हाण यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतेच्या विचारांवर आपण वाटचाल करत असून, सत्तेत सहभागी होऊन आपण याच विचारांवर कायम आहोत. आपली वैचारिक भूमिका तसुभरही बदललेली नाही, विकासासाठी आपण सत्तेत गेलो, असे त्यांनी सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवल्यासह नाशिक जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येत आहे. (latest marathi news)

त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही विकासाची कामे होतील. ते म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. रक्षाबंधनाच्या दिवशी दोन महिन्यांचे पैसे माता भगिनीच्या खात्यात जमा होतील. विविध विकासकामांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचा विश्‍वास निर्माण करण्यासाठी जनसंवाद यात्रा निर्माण येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर शेवाळे, शहराध्यक्ष दीपक लोणारी, भोलानाथ लोणारी, हुसेन शेख, महिला अध्यक्ष राजश्री पहिलवान, सुरेखा नागरे, दत्तूपंत डुकरे, शेखर होळकर, दत्ता रायते, शिवाजी सुपनर, बाळासाहेब पुंड, सचिन दरेकर, डॉ.श्रीकांत आवारे, सचिन कळमकर, रावसाहेब आहेर, मच्छिंद्र थोरात, अशोक नागरे, डॉ.चंद्रशेखर क्षत्रिय, प्रवीण बनकर, गौरव गोवर्धने, चेतन कासव, विलास गोऱ्हे, सीमा गायकवाड, सचिन सोनवणे, नितीन गायकवाड, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, सोहिल मोमीन, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, सुमित थोरात, भूषण लाघवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT