Revenue employees protesting at the tehsil office here on Wednesday. esakal
नाशिक

Revenue Employee Protest : राज्य महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन मालेगावात कायम

सकाळ वृत्तसेवा

Revenue Employee Protest : राज्य महसूल कर्मचारी संघटनेने प्रलंबित विविध मागण्या तडीस लावण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारीही (ता.१७) आंदोलन सुरूच होते. आंदोलनात तहसील, प्रांत व अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून व महसूल सहायक हे कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. (State revenue employees agitation continues )

महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने पुन्हा एकदा कामबंद आंदोलन सुरू केले. या कर्मचाऱ्यांनी १० जुलैला काळ्या फिती लावून कामकाज केले. ११ जुलैला स्थानिक पातळीवर निदर्शने केली. १२ जुलैला दुपारनंतर लेखणीबंद आंदोलन करत निषेध नोंदवला. या आंदोलनांची दखल सरकारने न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी सोमवार (ता.१५) पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी सकाळी प्रवेशद्वारावर एकत्र येत निदर्शने करत घोषणाबाजी केली. (latest marathi news)

कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आंदोलनामुळे माघारी परतावे लागले. महसुलाच्या दैनंदिन कामकाजावर या संपाचा परिणाम झाला. बिनशेती, फौजदारी, हद्दपार अशी प्रकरणे, प्रतिज्ञापत्र साक्षांकन, महसूल संकलन, टपाल विभाग, आकस्मिक मृत्यू प्रकरणे यांसह पुरवठा विभागाशी निगडित कामे ठप्प झाली. कर्तव्यावर हजर प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार एस. बी. धारणकर, रमेश खैर हे त्यांच्या पातळीवर शक्य तेवढ्या कामांचा निपटारा करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT