The state of the dam at Baglan, Haranbari, before removing the sludge, in the second picture, the state after removing the sludge by 8 thousand vehicles. esakal
नाशिक

Nashik News : ‘हरणबारी’ची साठवण क्षमता वाढणार! गाळ काढण्यामुळे परिणामः शेतकऱ्यांकडून मोफत गाळ नेण्यास प्रतिसाद

प्रशांत बैरागी

नामपूर : मोसम खोऱ्याला वरदान ठरलेल्या हरणबारी (ता. बागलाण) धरणात गेल्या पन्नास वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने साठवण क्षमता खालावली होती. याबाबत मोसम खोऱ्यातील पर्यावरणप्रेमी तरूणांनी सोशल मीडियावर चर्चा करून पालकमंत्री, अधिकारी, सामाजिक संघटना आदींच्या पुढाकारातून धरणातील गाळ उपसा करण्याच्या सेवाभावी कार्याला मूर्त स्वरूप दिले. शासनाकडून एक रुपयांचीही आर्थिक मदत न घेता गेल्या बारा दिवसात धरणातून सुमारे ८ हजार वाहनांतून हजारो ब्रास गाळ उपसा करण्यात आल्याने भविष्यात लाखो लिटर जलसाठा वाढणार आहे. (Nashik storage capacity of Haranbari dam will increase)

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद, अंतापूर, मुल्हेर, हरणबारी, नामपूर, सोमपूर, आसखेडा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत हरणबारी धरणातील गाळ काढण्यावर चर्चा केली. मविप्रचे तालुका संचालक सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद सोनवणे यांनी याकामी पुढाकार घेऊन मोसम खोरे जलसंवर्धन समितीची स्थापना केली. त्यानंतर आगामी काळात पाणीटंचाई निवारणासाठी लोकसहभागातून अनोखी समाजसेवा करण्याचे तरुणांनी ठरवले.

यंदा मोसम खोऱ्यातील प्रचंड दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. सरासरीपेक्षा गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने सर्वच जलसाठ्यांनी मार्च महिन्यातच तळ गाठला. यासर्व गोष्टीची उणीव लक्षात घेता ताहाराबाद, अंतापूर, मुल्हेर, नामपूर, सोमपूर, आसखेडा, वळवाडे येथील तरुण कार्यकर्ते व समाजसेवकांनी एकत्र येत मोसम व करंजाडी खोऱ्यांसाठी पाणीदार करण्यासाठी लोकसहभागातून गाळ उपसा करण्याची योजना आखली.

हरणबारी धरणात पाण्यापेक्षा गाळच जास्त असल्याने याबाबत जनजागृतीसाठी व्हाट्सएप ग्रुप तयार केले. धरणातील गाळ शेतीला उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांचा गाळ वाहून नेण्यासाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोसम खोऱ्यातील नागरिकांनी त्यासाठी लागणारी आर्थिक मदत, वाहन, पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर उपलब्ध करून दिले. (latest marathi news)

ज्या शेतकऱ्यांना हा गाळ शेतात टाकायचा आहे, असे शेकडो शेतकरी तयार झाले. त्यासाठी लागणारे शुल्कसुद्धा अगदी माफक ठेवण्यात आले. मोहीम साधारण पुढील तीन वर्षे सुरू ठेवण्याचा मानस कार्यकर्त्यांचा आहे. दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने काम सुरू आहे. गाळ काढण्याच्या कामासाठी डॉ. प्रसाद सोनवणे, विकास बत्तीसे, प्रवीण भामरे, दीपक कांकरिया, गजानन साळवे, दिनेश सावळा, राजू कुटे, अनिकेत सोनवणे, हेमंत पवार, सतीश भामरे आदींसह कार्यकर्ते अहोरात्र धरण परिसरात बसून आहेत.

"धरण परिसरात आगामी पावसाळ्यात पन्नास हजार बांबूंची लागवड केली जाणार आहे. बांबूमुळे धरणात गाळ येण्याचे प्रमाण थांबेल. पर्यावरणाच्या दृष्टीने फायदा होईल. निसर्गरम्य वातावरण तयार झाल्यावर पर्यटकांचीसुद्धा गर्दी वाढल्याने परिसरातील गरजू नागरिकांना रोजगाराची संधी निर्माण मिळतील. गाळ उपसा सेवाभावी कामासाठी मोसम खोरे जल संवर्धन समितीचे मोलाचे योगदान आहे."- डॉ. प्रसाद सोनवणे, तालुका संचालक, मविप्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT