Damage to onion shed due to rain accompanied by strong winds in the area. esakal
नाशिक

Nashik Pre-Monsoon Rain : वादळी पावसाने घेतला दोघांचा बळी; उमराणेत शेड कोसळून एकाचा मृत्यू

Pre-Monsoon Rain : जिल्ह्यात रविवारी (ता. ९) दुपारनंतर ठिकठिकाणी मृगाच्या पावसाने वादळीवाऱ्यासह जोरदार सलामी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Pre-Monsoon : जिल्ह्यात रविवारी (ता. ९) दुपारनंतर ठिकठिकाणी मृगाच्या पावसाने वादळीवाऱ्यासह जोरदार सलामी दिली. वादळामुळे झाडे पडणे, वीजतारा तुटणे तसेच शेड कोसळणे अशा घटनांनी मोठे नुकसान झाले आहे. उमराणे (ता. मालेगाव) येथे शेड कोसळल्याने एकाचा, तर तिसगाव येथे वीज कोसळून दुसऱ्याचा मृत्यू झाला. चांदवड, त्र्यंबेकश्वर, निफाड, सिन्नर, दिंडोरी, देवळा तालुक्यांत पावसाने जोरदार तडाखा दिला. (Nashik Storm rain claims two lives )

नांदूर येथे वीज कोसळून गाय मृत्युमुखी पडली. दरम्यान मृग नक्षत्रातील पहिलाच पाऊस असल्याने बळीराजाने त्याचे स्वागत केले आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून उकाडा वाढला होता. त्यामुळे मॉन्सूनच्या जोरदार आगमनाची प्रतीक्षा होतीच. रविवारी (ता. ९) उकाड्याने कहर केला होता. उमराणेसह परिसरात वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास पावसाला सुरवात झाली.

उमराणे परिसरातील कांदा शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. महावितरण कंपनीच्या ताराही तुटल्या. तिसगाव येथील देवीदास भावराव आहेर (वय ३४) उमराणे येथे काही वस्तू खरेदी करण्यासाठी आला होता. घरी परतत असताना अचानक वादळीवाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. (latest marathi news)

अशा परिस्थितीत देवीदास दोस्ती वजन काट्याजवळील अमित पवार यांच्या शेडमध्ये आसरा घेण्यासाठी थांबला होता. मात्र, अतिवादळाने शेड कोसळून देवीदासचा दबून मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तिसगाव येथील इंदिरानगर परिसरातील आकाश शरद देवरे (२१) पावसाच्या भीतीने मोकळ्या जागेत बांधलेले वासरू सोडण्यासाठी गेला असता त्याच्यावर वीज कोसळून तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी मालेगाव येथे नेत असताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला.

तिसगाव येथील दोन्ही तरुणांच्या आकस्मिक निधनाने गावावर शोककळा पसरली. देवीदास आहेर विवाहित होता. त्याच्या मागे पत्नी, आई-वडील, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. शरद अविवाहित असून, त्याच्यामागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. मालेगाव येथे शवविच्छेदनानंतर रविवारी रात्री या दोन्ही तरुणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, उमराणे येथील गायत्री सूरज देवरे ( २२) व अभय अजय देवरे (साडेतीन वर्षे) जखमी झाले.

सायंकाळनंतरही बरसला

सिन्नर तालुक्यात रविवारी पहाटेनंतर दुपारी उमराणे भागात जोरदार हजेरीनंतर सायंकाळी निफाड, त्र्यंबेकश्वर, कळवण तालुक्यात पावसाने हजेरी लावली. उमराणे परिसरात सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धावपळ उडाली. देवळा येथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान, सोमवारीही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT