Citylink Bus esakal
नाशिक

Nashik Citylink Strike : सिटीलिंक चालकांचा संप आजही राहणार?

Citylink Strike : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेने मनपाच्या सिटीलिंक बसचालकांच्या वेतनवाढीसाठी पुकारलेला बंद रविवारीही (ता. २८) कायम होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylink Strike : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेने मनपाच्या सिटीलिंक बसचालकांच्या वेतनवाढीसाठी पुकारलेला बंद रविवारीही (ता. २८) कायम होता. दोन्ही बस डेपोतून एकही बस धावू शकली नाही. मनसे कामगार संघटना व चालक मक्तेदार यांच्यात उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. दरम्यान, सोमवारी (ता. २९) आठवड्याची सुरवात असून, बससेवा ठप्प राहिल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, चाकरमाने व प्रवाशांना त्याचा फटका बसला. (strike called for wage hike by Citylink bus driver continued today )

महापालिकेने काही वर्षांपूर्वी सिटीलिंक बससेवा सुरू करून ठेकेदारामार्फत चालक व वाहक भरती केली होती. पूर्वीच्या एका राजकीय पक्षाच्या ठेकेदाराकडून वारंवार वेतन वेळेत दिले जात नसल्याने तब्बल सात ते आठ वेळा संप पुकारल्याने बससेवा विस्कळित झाली होती. मात्र, आता हा ठेका नवीन ठेकेदाराला दिला असला, तरी वेतनवाढ करावी, यासाठी चालकांनी शनिवारी (ता. २७) संप पुकारला. (latest marathi news)

४५० चालकांनी काम बंद केल्याने तपोवन व नाशिक रोड डेपोतून सलग दुसऱ्या दिवशी रविवारी एकही बस रस्त्यावर धावू शकली नाही. सिटीलिंक प्रशासनाने २८ चालकांवर मेस्मा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यात मागण्या व संप मागे घेण्याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान, संपामुळे सिटीलिंकला रोजच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याने मक्तेदाराला दिवसाला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT