NMC Smart School esakal
नाशिक

NMC Smart School : ‘स्मार्ट स्कूल’ मुळे मनपा शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल

Nashik News : स्मार्टसिटी कंपनी व महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये २७६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : डिजिटल संसाधन व संगणक प्रयोगशाळांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी तसेच उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षणाची संस्कृती वाढवण्यासाठी स्मार्टसिटी कंपनी व महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये २७६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे. (Students trend towards municipal schools due to smart schools Positive changes in quality of students)

स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची गोडी या निमित्ताने वाढल्याचे दिसून येत आहे. गुणवत्तेच्या दृष्टीने महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत उतरावा उद्देशाने महापालिका स्मार्टसिटी कंपनीकडून ८२ शाळांचे स्मार्ट स्कूलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

मे. पॅलेडियम सल्लागार संस्थेकडून स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे नियोजन होत आहे. स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत ८२ शाळांमध्ये ६५६ स्मार्ट क्लासरूम, डिजिटल अभ्यासक्रम, ६९ संगणक कक्ष, सीसीटीव्ही, शाळा प्रशासन प्रणाली (सॉफ्टवेअर) सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षकांना डिजिटल फळा वापरणे, डिजिटल अभ्यासक्रम, मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील ॲप्लिकेशन वापर, इंटरनेट ॲप्लिकेशन्स वापर.

स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापर या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ होत आहे. डिजिटल सामग्रीमुळे विद्यार्थी पटसंख्या वाढली आहे. पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल घडून आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी सातत्याने वाढ होत आहे. (latest marathi news)

आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल साधनांमुळे पालकांचा महापालिकेच्या शाळांबद्दलच्या दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे. परिणामी चालू शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल २७६४ विद्यार्थी वाढले आहेत. यापूर्वी विद्यार्थी संख्या २५००० होती. यंदाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये चार हजार एकोणीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

त्यापैकी १२५५ विद्यार्थी शाळा सोडून गेले आहेत. आठवी व दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. आठवीनंतर परिसरात माध्यमिक शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना अन्यत्र प्रवेश घ्यावा लागतो. दहावीनंतर विद्यार्थी बाहेर पडत असल्याने अशा विद्यार्थ्यांचा शाळा सोडून जाणाऱ्यांमध्ये समावेश असल्याचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश (कंसात शाळा सोडून गेलेले विद्यार्थी)

इयत्ता पहिली : २७८० (०)

- इयत्ता दुसरी : १५१ (२८)

- इयत्ता तिसरी - १९५ (३२)

- इयत्ता चौथी - २०४ (४५)

- इयत्ता पाचवी - २६४ (७७)

- इयत्ता सहावी - ८३ (३९०)

- इयत्ता सातवी - ८९ (४२)

- इयत्ता आठवी - १५० (६४१)

------------कोट-------------

"स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल घडून आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी सातत्याने वाढ होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल साधनांमुळे पालकांचा महापालिकेच्या शाळांबद्दलच्या दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे." - बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT