Savitribai Phule Pune University sakal
नाशिक

Nashik News : नाशिक उपकेंद्राला लवकरच मिळणार सहाय्यक कुलसचिव; विद्यापीठाकडून प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नाशिक आणि नगर येथील उपकेंद्रात सहाय्यक कुलसचिव निवडीसाठी प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. विद्यापीठ निधीतून हंगामी स्वरूपात ठराविक कालावधीसाठी करार पद्धतीने हे पद भरले जाईल. त्‍यासाठी पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत १० ऑक्‍टोबरपर्यंत दिली आहे.

नाशिक आणि नगर उपकेंद्रांसाठी सहाय्यक कुलसचिव भरतीसंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

गेल्‍या १८ मेस झालेल्‍या व्यवस्थापन परिषद बैठकीत सहाय्यक कुलसचिव भरतीला मंजुरी देण्यात आली होती. नुकतेच २६ सप्‍टेंबरला विद्यापीठाकडून हे पद भरण्यासंदर्भात सूचनापत्र जारी केले आहे. (Nashik sub centre will soon get an assistant registrar nashik news)

पुणे विद्यापीठात विद्यापीठ निधीतून कार्यरत असलेल्‍या तसेच विद्यापीठाशी संलग्‍न महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि संबंधित पदासाठी शैक्षणिक पात्रता व अनुभवाबाबत निकष पूर्ण करणाऱ्या सेवकांना अर्ज करता येणार आहे. नाशिक व नगर अशी सहाय्यक कुलसचिवांची एकूण दोन पदे भरली जाणार असून, त्‍यासाठी अर्ज करण्याची मुदत १० ऑक्‍टोबरपर्यंत देण्यात आली आहे.

पाच वर्षांचा असेल कार्यकाळ

सहाय्यक कुलसचिवपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. कोणत्‍याही मान्‍यताप्राप्त विद्यापीठाची पदव्‍युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असण्यासह अन्‍य विविध अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्‍यक असेल. सुरवातीस नियुक्‍ती रुजू तारखेपासून प्रथमतः एक वर्ष कालावधीसाठी हंगामी स्वरूपात करार पद्धतीची असेल.

एक वर्ष कालावधीमधील कामकाजासंबंधी विभागप्रमुख यांचा अहवाल व शिफारस घेऊन पुढील एक वर्ष कालावधीसाठी मुदतवाढ दिली जाईल. कामकाजासंबंधी विभागप्रमुखांचा अहवाल व शिफारशीवरून उर्वरित तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिली जाणार असल्‍याचे सूचनापत्रात नमूद केले आहे.

विद्यापीठ कामकाजाला मिळणार गती

शिवनई (ता. दिंडोरी) येथे विद्यापीठ उपकेंद्राच्‍या उभारणीचे काम सुरू आहे. उपकेंद्रात सहाय्यक कुलसचिव यांच्‍या नियुक्‍तीमुळे विद्यापीठ कामकाजाला गती मिळेल. विद्यार्थी व प्राध्यापकांना त्‍यांच्‍या समस्‍या, प्रश्‍न सोडविण्यासाठी पुण्याला दमछाक करण्याऐवजी नाशिकच्‍या स्‍तरावर समस्‍यांची सोडवणूक होण्यास मदत होईल. तसेच, अन्‍य कामकाजाला गती प्राप्त होईल, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये चरबी कोण मिसळत होतं? अमित शाहांना लिहिलं पत्र

EY Pune: 'इतके मेलेले लोक, फक्त अंतिम संस्कार...', CAच्या मृत्यूनंतर अश्नीर ग्रोव्हरचा व्हिडिओ व्हायरल

NZ vs SL, Test : बॉल आला अन् कॅप्टन साऊदीने झपकन एकाच हाताने पकडला अफलातून कॅच, पाहा Video

Accident: चूक कोणाची? वेगाने Bike पळवणाऱ्या तरुणाची, की त्या SUV चालकाची.... थरार Video Viral

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

SCROLL FOR NEXT