MLA Prof. Devyani Farande Regarding the question of Nashik In the meeting held in hall of Deputy Chief Minister  esakal
नाशिक

Nashik News : महत्वाच्या तांत्रिक पदांची यादी सादर करा! उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित असलेला महापालिकेचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याची मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या प्रश्नांसंदर्भात बोलाविलेल्या बैठकीत केली. त्याअनुषंगाने अतिमहत्त्वाच्या रिक्त पदांची यादी सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्त तसेच राज्याच्या नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना दिल्या. (Nashik News)

गुरुवारी (ता. २५) झालेल्या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, गृहनिर्माण विभागाचे वी. भा. सिंग, बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका प्रशासन उपायुक्त श्रीकांत पवार उपस्थित होते.

सिंहस्थ काळात महापालिकेत पुरेशी कर्मचारी व अधिकारी गरजेचे आहे. परंतु महापालिकेचा आस्थापना खर्च मर्यादेपेक्षा जास्त असल्याने आकृतीबंध मंजूर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिले. (latest marathi news)

त्याचबरोबर महत्त्वाचे रिक्त पदे भरणेदेखील आवश्यक असल्याने महापालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या. नाशिक- मुंबई महामार्गाची मोठी दुरावस्था झाली असून, तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार फरांदे यांनी स्पष्टीकरण दिले.

५ ऑगस्टपर्यंत रस्त्याची सुधारणा करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. काम करण्यापूर्वी पर्यायी रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाच्या करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या. रस्त्याची सुधारणा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पाहणी करणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT