milk Producer esakal
नाशिक

Milk Producer : दूध उत्पादकांना ऑगस्टमध्ये अनुदान; नाशिक विभागातून 144 प्रकल्पांची नोंदणी

Milk Producer : गायीच्या दुधाला कमी दर० मिळत असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने १ जुलैपासून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Milk Producer : गायीच्या दुधाला कमी दर० मिळत असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने १ जुलैपासून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी प्रादेशिक दुग्धविकास विभागाकडे पाच जिल्ह्यांतील १४४ प्रकल्पांची आतापर्यंत नोंदणी झाली आहे. त्यांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना येत्या ऑगस्टमध्ये अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील. (Subsidy to Milk Producers in August Registration of 144 project )

दूध भुकटी व बटरचे भाव कोसळल्याने दुधाचे दर घसरले आहेत. सद्यःस्थितीत गायीचे दूध २७ ते ३० रुपये प्रतिलिटरने विक्री होते. हा दर गृहित धरून राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील दूध उत्पादकांना १ जुलै २०२४ पासून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार येथील एक लाख २९ हजार ३१९ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यापूर्वी ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ या कालावधीत ७७ कोटी ४९ लाख ९८ हजार ७४५ रुपयांचे अनुदान घेतले आहे.

विभागातील पाच लाख २६ हजार ५१९ गायींची नोंद पशुसंर्वधन विभागाकडे करण्यात आली आहे. या योजनेनंतर विभागाने पशुधनाचे ‘टॅगिंग’ करण्याची प्रक्रिया गतिशील केली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल, यादृष्टीने पावले उचलली. सद्यःस्थितीला विभागातील १४४ दूध प्रकल्पांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रत्येकी दहा दिवसांनी अनुदानाची रक्कम वर्ग केली जाणार आहे.

पशुधनाची माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे. माहिती प्राप्त होताच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अनुदान वर्ग केले जाईल. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ५४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दूध भुकटी निर्यात करणाऱ्या दहा प्रकल्पांची नोंदणी जवळपास पूर्ण होण्यात आहे. त्यांनाही ३० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. (latest marathi news)

दरम्यान, राज्य सरकारने गायीच्या दूध विक्रीचा व्यवसाय करणारे शेतकरी व दूध उत्पादकांना जुलैपासून घोषणा केल्यानंतर जे उत्पादक सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध देतात, त्यांनाच हे अनुदान मिळणार आहे. त्यातही दुधाची मात्रा ही ३.५/८.५ याप्रमाणे (फॅट) ग्राह्य धरली जाणार आहे. त्यापेक्षा कमी गुणवत्तेसाठी ३० पैसे वजावट केली जाईल. तसेच प्रती पॉईंट ३० पैसे वाढ करण्यात येणार आहे.

विभागातील केंद्रे अशी

अहमदनगर-९०

नाशिक-४०

जळगाव-११

नंदुरबार-धुळे-७

''विभागातील बल्क मिल्क कुलर्स अथवा शीतकलन केंद्र, दूध प्रकल्पांनी संबंधित जिल्हा दूध व्यावसायिकांशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त पात्र दूध उत्पादकांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा.''-श्रीकांत शिरपूरकर, प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

IND vs AUS 1st Test: टीम इंडियाचा विजय अन् पाकिस्तानला धक्का; Jasprit Bumrah ने मोडला कपिल देव यांचा विक्रम, ७ मोठे पराक्रम

Eknath Shinde: शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंची मागाठाणेत हॅट्‌ट्रिक, जाणून घ्या विजयाची इनसाइड स्टोरी

Sangli Election Results : पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात? खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यापैकी एकाला मिळणार संधी

SCROLL FOR NEXT