burninig bus esakal
नाशिक

Nashik News : खिरमाणी फाट्यावर 'द बर्निग' बसचा थरार

Latest fire news : अचानक पेट घेतल्याने बस आगीत खाक झाल्याची घटना तीन वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने ३५ ते ४० बसमधील प्रवासी समयसूचकतेने खाली उतरल्याने जिवितहानी टळली.

दीपक खैरनार -सकाळ वृत्तसेवा

अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील खिरमाणी येथील फाट्यावर सटाणा आघारातील प्रतापपुर, सटाणा हि बस बस थांब्यावर प्रवासी घेत असताना अचानक पेट घेतल्याने बस आगीत खाक झाल्याची घटना तीन वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने ३५ ते ४० बसमधील प्रवासी समयसूचकतेने खाली उतरल्याने जिवितहानी टळली. सटाणा अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. (nashik sudden fire broke out bus in ambasan )

 सद्या उन्हाची कमालीची तीव्रता वाढल्याने दुपारी रस्त्यावर वाहने कमी प्रमाणात दिसून येत आहेत. दरम्यान सटाणा आघारातील परिवहन मंडळाची बस क्रमांक (एमएच २०, बीएल ४२५१) ही दुपारी तीनच्या सुमारास प्रतापपुरहून सटाण्याच्या दिशेने धावत असताना खिरमाणी फाट्यावर एका प्रवाशाकरीता बस थांबवली तोच इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याचे चालक रतन ह्याळीज यांच्या निदर्शनास आले त्यांनी ताबडतोब बसमधून उडी मारली व वाहक गोकुळ सूर्यवंशी दोघांनी बसमधील ३५ ते ४० प्रवाशांना ताबडतोब बसमधून उतरण्याच्या सुचना केल्या प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून उड्या घेऊन बाहेर पडले.

बघताबघता धुराच्या लोळातुन बस आगीच्या रौद्र रूपात घेरली गेली होती. स्थानिक नागरिकांनी व ग्रामसेवक दिनेश कापडणीस यांनी ताबडतोब वरीष्ठ कार्यालयात माहिती दिली. काही वेळातच सटाणा अग्निशमन दल दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले होते. भयानक आगीमुळे बसचा सांगाडा उरला होता. दरम्यान घटनास्थळी पोलीस प्रशासन तसेच राजेंद्र आहिरे आघार व्यवस्थापक दाखल झाले होते. ही बस सायंकाळी सटाणा रावळगाव मुक्कामी बस जाणार होती असे आघार व्यवस्थापक श्री. आहिरे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT