nashik sugar factory boiler will burn on Dussehra news sakal
नाशिक

Nashik Sugar Factory: दसऱ्याला ‘नासाका’चा बॉयलर पेटणार : खासदार गोडसे

सकाळ वृत्तसेवा

Hemant Godse : नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन मंगळवारी (ता. २४) सकाळी प. पू. १००८ महामंडालेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.

यंदा अडीच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे. (nashik sugar factory boiler will burn on Dussehra news )

नऊ वर्षांपासून बंद असलेला कारखाना गेल्या वर्षी अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अॅण्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीने चालविण्यासाठी घेतलेला आहे. चाचणी हंगाम व जुनी मशिनरी तसेच ऊसतोड कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे मागील वेळी ६८ हजार टन गाळप करण्यात आले.

या उसाला कारखान्याने एकरकमी दोन हजार ४०१ रुपये प्रतिटन भाव दिला. कारखाना सुरू झाल्याने ४०० बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असून, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांतील १७ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

येत्या २०२३-२४ हंगामासाठी महामंडालेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते मंगळवारी बॉयलर पेटणार आहे. शेतकऱ्यांची ऊसतोडणी वेळेत व्हावी, यासाठी सुमारे अडीच हजार तोडणी कर्मचारी असणार आहेत. गळीत हंगाम २०२३-२०२४ साठी अडीच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे.

कारखान्याच्या इतिहासात चालू गळीत हंगाम हा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने सर्व ऊस उत्पादकांनी आपल्या उसाचा पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन गोडसे यांनी केले.

बॉयलर पेटविण्याच्या कार्यक्रमास कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार गोडसे यांच्यासह संचालक बी. टी. कडलग, शेरझाद पटेल, सागर गोडसे, नामदेव कडलग, रूकसिन पटेल, भाग्यश्री गोडसे, विलास आडके, सरव्यवस्थापक जे. सी. कुरणे आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Live Updates : तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा एफआयआर नोंदवला

SCROLL FOR NEXT