A Raswanti shop on the national highway. esakal
नाशिक

Summer Heat : रसवंतीच्या घुंगरमाळा, लावि रसशौकिनांना लळा! ऊन्हाच्या कडाक्यात वाढ

Summer Heat : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शरीरात थंडावा निर्माण करणारा व आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी असणाऱ्या उसाच्या रसाला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

गोविंद अहिरे : सकाळ वृत्तसेवा

Summer Heat : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शरीरात थंडावा निर्माण करणारा व आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी असणाऱ्या उसाच्या रसाला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. रसवंतीचे घुंगरू वाजू लागले की ऊनाच्या झळांनी त्रस्त नागरिकांची पावले रसवंतीगृहाकडे वळू लागतात. रसवंतीगृहाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. (nashik Sugarcane juice is gaining popularity among consumers due to increasing temperature marathi news)

रसवंतीगृहाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. आता दिवसेंदिवस ऊन्हाच्या कडाक्यात वाढ होत असल्याने नागरिकांकडून शीतपेयांना पसंती दिली जात आहे. साधारण सकाळी दहानंतर उन्हाचा कडाका वाढतो. तेव्हापासून ऊसाच्या रसाला मागणी वाढत असते. चांदोरी, सायखेडा (ता. निफाड) भागातून रसवंतीसाठी लागणारा ऊस हा व्यावसायिकांना थेट पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे रसवंतीधारकांची ऊस आणण्याच्या त्रासापासून मुक्तता होते.

काय आहे ऊसात?

उस मुळातच अत्यंत गुणकारी व पौष्टिक असतो. चवीला गोड आणि कॅलरी कमी असलेल्या उसापासून आपल्या शरीराला अनेक मार्गांनी फायदा होऊ शकतो. असे म्हणतात की, एक जादुई फळ म्हणून ओळख असलेल्या उसामुळे शरीर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत होते.

प्रतिकारशक्ती देखील वाढते. उसामध्ये असलेली फायबरची उच्च पातळी कावीळ, अशक्तपणा आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यास मदत करते. उस आपले शरीर थंड करण्यासह जठराला आराम देण्याचेही काम करतो. (latest marathi news)

उसाचा दर : ८००० रुपये टन

रस हाफ ग्लास : १० रुपये

रस फुल ग्लास : २० रुपये

रसाचे गुणकारी फायदे

मधुमेहींसाठी फायदेशीर

यकृतासाठी गुणकारी

प्रतिकारशक्तीत वाढ

वजन घटविण्यात मदत

तजेलदार त्वचा

हाडांच्या आरोग्यास लाभ

''राष्ट्रीय महामार्गावर आम्ही दरवर्षी रसवंती दुकान थाटतो. पारंपरिक शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पत्नीच्या सहकार्याने उन्हाळ्यात हा व्यवसाय करतो. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्यास ग्राहक आवर्जून येथे थांबतात.''- काशीनाथ वानखेडे, रसवंतीचालक, वनोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT