nmc esakal
नाशिक

Nashik News : देवळाली कॅन्टोन्मेंट ठरणार ‘नाकापेक्षा मोती’ जड; समावेशाने महापालिकेचे अर्थकारण बिघडणार

Nashik : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड नाशिक महापालिकेत सामावून घेण्यासंदर्भात सूचना मागविण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड नाशिक महापालिकेत सामावून घेण्यासंदर्भात सूचना मागविण्यात आल्या आहेत. देवळालीचे उत्पन्न लक्षात घेऊन भगूर नगरपालिकेत समावेश होण्याऐवजी पायाभूत सुविधा पुरविण्याची क्षमता असलेल्या नाशिक महापालिकेत समाविष्ट होण्याकडे कल आहे. परंतु, दुसरीकडे देवळाली कॅन्टोन्मेंटच्या वार्षिक ४० कोटींचा मालमत्ता कर मिळणार असला तरी मासिक ३६ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. (nashik Suggestions have been invited regarding inclusion of Deolali Cantonment Board in NMC marathi news)

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने देशातील ६२ कटक मंडळांचे (कॅन्टोन्मेंट बोर्ड) लगतच्या महापालिका किंवा नगरपालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भगूर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने देवळाली कटक मंडळाचा निधी भगूरच्या पायाभूत सुविधांवरच खर्च होण्याची भीती आहे. त्यामुळे नाशिक महापालिका हद्दीतच देवळाली कटक मंडळाचा समावेश होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

त्याअनुषंगाने केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने हरकती व सूचना मागविल्या आहेत. ५ मार्चपासून तीन आठवड्यात पुणे येथील कार्यालयात हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देवळालीचा नाशिक महापालिकेत समावेश झाल्यानंतर त्याचा महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. एकीकडे भौगोलिक हद्द वाढणार असली तरी पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होईल.

देवळाली कटक मंडळाच्या हद्दीतील नागरिकांना कराचा बोजा सहन करावा लागेल. परंतु त्याची झळ तत्काळ बसणार नाही. नियमाप्रमाणे पाच वर्षे कर लागू होणार नाही. पाच वर्षानंतर मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या वार्षिक कर पात्र मूल्यावर २५ टक्के कर आहे. त्यानंतर निवासी क्षेत्रासाठी ७३ टक्क्यापर्यंत, तर अनिवासी क्षेत्रासाठी ८२ टक्क्यापर्यंत कर आकारणी होईल. देवळालीकरांना करवाढी व्यतिरिक्त अन्य कुठलीच झळ बसणार नाही. परंतु नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात वाढ झाल्यानंतर पायाभूत सुविधा पुरविताना कसरत करावी लागेल. (latest marathi news)

समावेशानंतर बंधनकारक बाबी

देवळाली समावेशानंतर महापालिका क्षेत्राचा भगूरच्या विजयनगरपर्यंत विस्तार होऊन १३ हजार एकर क्षेत्र वाढेल. पाऊण लाखांनी लोकसंख्या वाढेल. रस्ते, ड्रेनेज, आरोग्य व वैद्यकीय सुविधा, दिवाबत्ती, शाळा सुविधा पुरविणे बंधनकारक राहील. दोन विभागीय कार्यालयासह नगरसेवकांची संख्या दोनने वाढण्याची शक्यता आहे. जलशुद्धीकरण केंद्र व मलशुद्धीकरण केंद्र वाढविणे आवश्‍यक राहणार आहे.

देवळाली कॅन्टोन्मेंटची सद्यःस्थिती

- एकूण क्षेत्रफळ- १३ हजार एकर

- एकूण लोकसंख्या- ५४,०४७

- निवासी मालमत्ता- १४ हजार

- अनिवासी मालमत्ता- १४००

- घरपट्टी- वार्षिक कर पात्र मूल्यावर- २५ टक्के.

- पाणीपट्टी- एक हजार लिटरला ४.८० रुपये (निवासी)

- एक हजार लिटरला ३० रुपये (अनिवासी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT