Gorthan Damage to the vineyard in the Sukhoi plane crash six years ago. esakal
नाशिक

Nashik Sukhoi Crash : गोरठाण विमान दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या; 7 वर्षांनंतरही शेतकरी भरपाईविना

Nashik News : शिरसगाव (ता. निफाड) येथील सुखोई विमान दुर्घटनेने सहा वर्षांपूर्वी झालेल्या गोरठाण (ता. निफाड) येथील अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : शिरसगाव (ता. निफाड) येथील सुखोई विमान दुर्घटनेने सहा वर्षांपूर्वी झालेल्या गोरठाण (ता. निफाड) येथील अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही विमान दुर्घटनांमध्ये तंतोतंत साम्य आढळते. शिरसगावप्रमाणेच सहा वर्षांपूर्वी गोरठाण (ता. निफाड) येथे झालेल्या दुर्घटनेत शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. (Nashik Sukhoi Crash)

पण, त्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. एचएएलने भरपाईचा चेंडू विमा कंपनीकडे टोलवत हात वर केले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. २७ जून २०१८ मध्ये सकाळी साडेदहाची वेळ... निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी ठुशी शिवारात घिरट्या घालणारे विमान अचानक द्राक्षबागेत कोसळते अन् स्फोटाच्या आवाजाने पंचक्रोशी हादरते.

तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच, वैमानिक हवाईछत्रीच्या सहाय्याने उडी घेत सुरक्षितपणे जमिनीवर उतरले. पण द्राक्ष, डाळिंब बागांवर कोसळलेल्या विमानामुळे ७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक पिके उभे करण्यासाठी केली होती. विमान दुर्घटनेत ती पिके बेचिराख झाली. उर्वरित बागा तोडाव्या लागल्या. शिवाय उत्पन्नही बुडाले. अपघातामुळे काही क्षेत्रही नापिक झाले. (latest marathi news)

नुकसानीची दमडीही मिळाली नाही

गोरठाण येथील घटनेला सहा वर्ष पूर्ण होत आहेत. शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीसाठी एचएएल कंपनीकडे जिल्हा प्रशासनामार्फत १५ कोटी ६५ लाख रुपयांचा दावा केला. पण, एचएएलने संबंधित विमानाचा विमा असलेल्या इन्शुरन्स कंपनीकडे नुकसानीची रक्कम मागावी, अशी टोलवाटोलवी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.

विमा कंपनीने तीन लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न केला. सहा वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप दमडीही मिळालेली नाही. याविरोधात बाधित शेतकरी निफाडच्या न्यायालयात गेले आहेत. योगेश ढोमसे, विलास निकम, सुखदेव निफाडे, वसंत जगताप, तानाजी ढोमसे, बाळनाथ पुरकर, अलका ढोमसे, संदीप ढोमसे, संजय ढिकले आदी शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT