Due to the increasing temperature on College Road, which is the busiest and food court in the city, there is a chill in the evening around 6 p.m. esakal
नाशिक

Nashik Summer Heat : महानगरेही होतायेत उष्णतेची बेटे...मालेगावात 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Summer Heat : उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुबार पाठोपाठ नाशिक जिल्हाही सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांमध्ये समावेश होवू पाहत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Summer Heat : उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुबार पाठोपाठ नाशिक जिल्हाही सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांमध्ये समावेश होवू पाहत आहे. मानवनिर्मित कारणे, वाढते औद्योगिक, हवेचे प्रदूषण, वाढत्या शीतकरणीय उपकरणांमुळे हवेत क्लोरोफार्म वाढला आहे. कमी होणारे जंगल व खालावणारी पाण्याची पातळी यामुळे महानगरे व मोठी शहरे उष्णतेची बेटे म्हणून आकाराला येत आहेत. (nashik summer heat Malegaon recorded temperature of 43 degrees Celsius )

मालेगाव शहर व परिसर गेली तीन दिवस सूर्यनारायणाचा प्रकोप झेलत आहे. शहरात गुरुवारी (ता.१८) या हंगामातील सर्वात उच्चांकी ४३.४ अंश तर नाशिकमध्येही.......... अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे. अवाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून कामकाजावर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खाते विभागाने उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील बहुसंख्य भागात उष्णतेची लहर कायम राहील असा अंदाज यापूर्वीच वर्तविला आहे.

शहर व परिसराचे वाढते तापमान लक्षात घेता सामान्य रूग्णालयातील उष्माघात कक्ष सज्ज आहे. तथापि अद्याप या कक्षात रुग्ण दाखल झाला नाही. वाढत्या तापमानामुळे तोंड येणे, अंगावर पुरळ, घामोळ्या, फोड येणे, सर्दी, खोकला, थंडी, ताप आदी साथ आजारात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर लहान मुले व वृध्दांची खासकरून काळजी घ्यावी. शक्यतो दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.

अति महत्वाच्या कामासाठी बाहेर गेल्यास छत्री, गॉगल, टोपी, उपरणे यांचा वापर करावा असे आवाहन सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील यांनी केले आहे. विशेष म्हणजे दिवसभर कडाक्याचे ऊन जाणवत असले तरी सायंकाळी ढगाळ वातावरण होते. पाऊसही पडत नसल्याने उन्हाच्या झळा तीव्रतेने जाणवत होत्या. एप्रिलचा अखेरचा आठवडा व मे चे पंधरा दिवस आता कसे जाणार याचीच चिंता शहरवासियांना भेडसावत आहे.

वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. ग्रामीण भागातील कूपनलिका आटल्या आहेत. भाजीपाला, फुले व फळ पिकांनी वाढत्या उन्हामुळे माना टाकल्या आहेत. आज दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट होता. सायंकाळनंतरही कामाला उत्साह जाणवत नव्हता. घरोघरी व आस्थापनांमध्ये एसी, पंख्याशिवाय बसणे अवघड झाले होते. पंखे देखील गरम हवा फेकत होते. एकूणच जनजीवनावर वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम झाला. (latest marathi news)

''ग्लोबल वॉर्मिग हे भविष्यातील मोठे संकट आहे. एकूण भूभागाच्या ३३ टक्के भाग जोपर्यंत वनराई व जंगल होत नाही, तोपर्यंत ही स्थिती कायम राहील. सिमेंट कॉंक्रीटचे जंगल घातक ठरू पाहत आहे. औद्योगिक, हवा प्रदूषण व वाढते शीतकरणीय उपकरणे अशा मानवनिर्मित चुकाच उष्णतेच्या लाटेला कारणीभूत आहेत. फ्रीज, एसी अशा शीतकरणीय उपकरणांमुळे हवेत क्लोरोफ्लोरा, कार्बन (सीएफसी) वाढला आहे. यामुळे ओझोनचा थर कमी होऊन सूर्यापासून निघणारी अतीनिलकिरण थेट भुपृष्टावर येतात. यातून सनस्ट्रोक बर्न याचा मोठा त्रास होतो. प्रत्येक बंगला बांधणाऱ्या व्यक्तीने किमान पाच झाडे तरी लावून त्यांचे संगोपन करायला हवे, अन्यथा बिकट स्थिती उद्‌भवेल. यासाठी वनसंरक्षण व वृक्षारोपण ही व्यापक लोकसहभागाची चळवळ झाली पाहिजे.''-प्राचार्य सुभाष निकम, भूगोल तज्ज्ञ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालय, निमगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT