Nashik Summer Heat : तप्त उन्हाळ्याच्या झळा सोसत असलेल्या नाशिककरांना तापमानाच्या घसरणाऱ्या पाऱ्याचे आकडे काही प्रमाणात सुखावणारे ठरत आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात सहा अंशांची घसरण नोंदविली असून, किमान तापमानात दोन अंशांची घसरण झालेली आहे. मात्र असे असले तरी उकाड्यापासून नागरिकांना तूर्तास दिलासा मिळालेला नाही. गेल्या बुधवारी (ता.२२) नाशिकचे कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदविले होते. ( Temperature dropped by 6 degrees in 5 days of city)
यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामातील हे उच्चांकी कमाल तापमान ठरले होते. त्यामुळे या दिवशी अक्षरशः सूर्य आग ओकत असल्याची अनुभूती नाशिककरांना आली होती. मात्र त्यानंतर सातत्याने पारा घसरत असून, सलग पाचव्या दिवशी पाऱ्यात घसरण नोंदविली आहे. रविवारी (ता.२६) नाशिकचे कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
त्यानुसार पाच दिवसांत पारा सहा अंशांहून अधिक घसरलेला आहे. तापमानाच्या आकडेवारीत जरी घट झालेली असली तरी प्रत्यक्षात उकाड्यापासून नागरिकांना अद्याप तरी दिलासा मिळालेला नाही. दिवसाचे काही तास प्रखर सूर्यकिरणे नागरिकांची परीक्षा घेत आहेत. त्यामुळे नाशिककर आता मॉन्सूनची आतुरतेने वाट बघत आहेत. (latest marathi news)
ढगाळ वातावरण, पाऱ्यामुळे उकाडा घटला
रविवारी शहर परिसरात ढगाळ वातावरण राहिले. मात्र वातावरणात वारा वाहता असल्याने उकाड्यात काही प्रमाणात घट जाणवत होती. पावसाला सुरवात होण्यापूर्वी पुढील काही दिवस उन्हाची अधिक तीव्र राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे.
नाशिकचे गेल्या पाच दिवसांतील तापमान-
(अंश सेल्सिअसमध्ये)
दिनांक कमाल किमान
२२ मे ४२.० २६.८
२३ मे ४१.२ २६.४
२४ मे ३८.७ २४.७
२५ मे ३७.३ २४.९
२६ मे ३५.८ २४.६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.