Summer Heat Waves esakal
नाशिक

Nashik Summer Heat Waves : नांदगाव तालुक्यात उष्माघाताची लाट? आवश्‍यक काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

Nashik News : पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होणार असल्याने नागरिकांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : शहर व तालुक्यात मार्च मध्यंतरीच उन्हाचा पारा चढला असून सद्य: स्थितीत तालुक्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची तीव्र झळा जाणवू लागल्या असून उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होत आहे. यातच पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होणार असल्याने नागरिकांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (Nashik Summer Heat wave in Nandgaon taluka)

तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने दुष्काळाचे सावट असल्याने प्रामुख्याने नांदगाव, येवला या तालुक्यांमध्ये उष्मघाताची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हाचा पार वाढत असल्याने उष्माघात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या दृष्टीने जिल्ह्यातील ११२ आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केले आहे.

यंदा सरासरीपेक्षा पाऊस झाला आहे जिल्ह्यात दुष्काळाचे संकट गंभीर आहे.यातच, मार्च महिन्याच्या मध्यावर्ती पासूनच उष्णतेची लाट वाढत आहे आत्ताच जिल्ह्यात उन्हाचा पारा हा ३५ अंशांपर्यंत पोचला आहे पुढे एप्रिल, मे मध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. फेब्रुवारीत सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे उष्माघात प्रतिबंधात्मक उपायांवर प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केला आहे. उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी उपाययोजना असावी, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात सज्जता ठेवण्यात आली आहे.

उष्णतेची लाट म्हणजे काय?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्या जवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवले गेले किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा ४ ते ५ अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचे मानले जाते.

काय काळजी घ्याल

तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे त्याचे गंभीर परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात. त्यामुळे अशा वातावरणात आपण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी उन्हात बाहेर पडणे शक्यतो टाळा, उन्हात बाहेर पडताना टोपी, स्कार्फ आणि सनस्क्रीनचा वापर करा, उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिणे टाळा, थोडा वेळ शांतपणे बसा, गुळाचा एखादा खडा चघळा, नॉर्मलला आल्यावर पाणी प्यावं.

"उष्णतेची लाट आल्यानंतर आपण थेट ऊन्हाच्या संपर्कात येणं टाळले पाहिजे. शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं. तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं. लिंबू सरबत, तांदळाची पेज, ताक आदी पेय घ्या, चहा, कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक यांच्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ते घेणे टाळा." - डॉ.सागर भिलोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंझ! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

SCROLL FOR NEXT