Nashik Summer Heat : नाशिक शहरात लग्नासाठी आलेल्या ४७ वर्षीय महिलेचा नांदूर नाका येथील मंगल कार्यालयाबाहेर येताच चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ३०) दुपारी घडली. सदरील महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Woman dies of heat stroke at Nandur Naka area )
सुनीता नितीन कारवाळ (वय ४७, रा. सम्राटनगर, सूतगिरणी दिघी रोड, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता कारवाळ या कुटुंबीयांसह नांदूर नाका परिसरातील एम्पायर गार्डन मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या.
दुपारी अडीचच्या सुमारास त्या मंगल कार्यालयातून बाहेर आल्या आणि कार्यालयाच्या गेटवरच त्या चक्कर येऊन पडल्या. त्यांना पती नितीन कारवाळ यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात साडेचारला दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला.
या प्रकरणी आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट असून, उष्माघातामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.