Nashik Gangapur Dam esakal
नाशिक

Nashik Gangapur Dam : गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी सर्वेक्षण

Nashik News : गंगापूर धरणाच्या मध्यभागात असलेला जवळपास ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याचा कायमस्वरूपी वापर होण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर धरणाच्या मध्यभागात असलेला जवळपास ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याचा कायमस्वरूपी वापर होण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. धरणात चर खोदल्यास पंपिंग स्टेशनपर्यंत मध्यावरचे पाणी येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (Nashik Gangapur Dam)

शहराला मुख्यत्वे गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जवळपास ५५ टक्के पाणी हे गंगापूर धरणातून उचलले जाते. गंगापूर धरणावर मराठवाड्यातील पाणीपुरवठादेखील अवलंबून आहे. मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार खालच्या धरणांमध्ये म्हणजे जायकवाडी धरणामध्ये अपुरा जलसंचय झाल्यास वरच्या धरणांमधून म्हणजे गंगापूर धरणातून पाणी सोडणे बंधनकारक आहे.

मागील वर्षी गंगापूर धरण परिसरात पुरेसा पाऊस झाला नाही. मात्र असे असले तरी, जायकवाडीची तूट भरून काढण्यासाठी नाशिक व नगरच्या धरणांमधून ८.६ टीएमसी पाणी जायकवाडी धरण्यात सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाणी सोडले गेले. त्यामुळे नाशिक महापालिकेने मागणी केलेली ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी घटविली. महापालिकेला ७८४ दशलक्ष घनफूट कमी पाणीसाठा मिळाला. (latest marathi news)

जवळपास पाच हजार चारशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले. जून महिन्यात पाणीसाठा खालावण्याची शक्यता असल्याने धरणाच्या मध्यभागी असलेला पाणीसाठा जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यासाठी निविदादेखील काढण्यात आली.

मात्र, आचारसंहितेमुळे सर्वेक्षक सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया रखडली. आचारसंहिता संपल्यानंतर अंतिम प्रक्रिया सुरू झाली. त्यात नवी मुंबई येथील एसके डब्ल्यू सॉईल ॲन्ड सर्वे या सल्लागार कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. सर्वेक्षक सल्लागार कंपनीकडून आठ दिवसात काम पूर्ण करण्याची हमी देण्यात आली आहे.

गंगापूर धरणातील चर खोदला जाणारा खडक कशा स्वरूपाचा आहे व त्याचे गुणधर्म काय मुरुमाची काठिण्य पातळी याची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच चर होण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT