Acharya Chandragupta Gurudev awarding Sushila Patni with the Living Saraswati Award. esakal
नाशिक

Nashik News : जिवंत सरस्वती पुरस्काराने सुशीला पाटणी सन्मानित; वयाच्या 83 व्या वर्षी करतात सेवा; कार्याचा भारतभर गौरव

Nashik News : जैन धर्मीयांचे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सिद्धक्षेत्र असलेल्या गजपंथा सिद्धक्षेत्र (चामरलेणी) येथे राहत असल्याने तेथे येणाऱ्या अनेक जैन साधू-संतांची सेवा करीत होत्या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : म्हसरूळ येथे राहणाऱ्या सुशीला मल्लिकुमार पाटणी यांना प.पू. आचार्य चंद्रगुप्त गुरुदेव यांच्या हस्ते जिवंत सरस्वती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Sushila Patni honored with Zeevi Saraswati Award)

सुशीला पाटणी गेल्या ६३ वर्षांपासून म्हसरुळ येथे वास्तव्यास आहेत. धुळ्याचे माहेर असलेल्या सुशीला यांचे लग्न म्हसरुळ येथील मल्लिकुमार पाटणी यांच्याशी १९६१ साली झाले. जैन धर्मीयांचे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सिद्धक्षेत्र असलेल्या गजपंथा सिद्धक्षेत्र (चामरलेणी) येथे राहत असल्याने तेथे येणाऱ्या अनेक जैन साधू-संतांची सेवा करीत होत्या.

त्यांना आहार देणे, वैय्यावृती करणे, विहार करणे, त्यांच्याकडून धर्माची शिकवण घेणे हा दिनक्रम सलग १५ वर्ष चालला. त्यानंतर त्यांनी गजपंथा येथे व्यवस्थापकाची जबाबदारी घेतली. संस्थेचे दैनंदिन कार्य करीत येणाऱ्या भाविकांची सेवा केली.

पूर्ण भारतभर नावलौकिक मिळविला. या दरम्यान दररोज स्वाध्याय, पूजा न चुकता केली. १९९६ पासून निवृत्ती घेत पूर्णपणे धार्मिक जीवनाचा अंगीकार केला. क्षेत्रावर येणारे अनेक साधू सुशीला यांच्याकडून धर्माचे ज्ञान घेत. (latest marathi news)

समाजातील श्रावक-श्राविका त्यांच्याकडून धार्मिक शिक्षण घेतात. २०१८ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर दु:खातून सावरत अविरतपणे कार्य चालू ठेवले. वयाच्या ८३ व्या वर्षी धार्मिक स्वाध्यायचे क्लासेस घेतात. २०१५ मध्ये प.पू. मुनिश्री विप्रणसागर गुरुदेवांच्या हस्ते विद्वत विशारद पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले.

सध्या गजपंथा येथे चातुर्मासानिमित्त वास्तव्यास असलेले आचार्य चंद्रगुप्त महाराज यांनी सन २००२ मध्ये सुशीला यांच्याकडून शिक्षण घेतले होते. त्यांच्या कार्याचा आवाका बघून आचार्यश्रींनी त्यांना जिवंत सरस्वती पुरस्कार देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर जिल्ह्यातून अनेक भाविक आले होते.

"शेकडो लोकांच्या टाळ्यांच्या गजरात पुरस्कार मिळताना भावूक झाले. हा माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार आहे."- सुशीला पटणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT