Jailed esakal
नाशिक

Nashik Crime News : संशयित काळेंना न्यायालयीन कोठडी; महिला कर्मचाऱ्यास 3 दिवसांची पोलिस कोठडी

Nashik Crime : ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तत्कालीन सचिव संशयित अरुण काळे यांना अटक केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्यात ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तत्कालीन सचिव संशयित अरुण काळे यांना अटक केली होती. त्यांना दुसऱ्यांदा तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. ती संपुष्टात आल्याने काळेंना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर महिला कर्मचाऱ्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Suspect kale judicial 3 days police custody of female employee )

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १२ पावती पुस्तकांचा गैरवापर करून, एकूण ८९ लाख ७७ हजार २०० रुपयांचा अपहार केला. कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी समितीचे सचिव प्रकाश घोलप यांनी सुनील जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संशयित जाधव यांनी प्रथम जामिनासाठी अर्ज केला मात्र, तो न्यायालयाने फेटाळला होता. (latest marathi news)

तसेच या गुन्ह्यात तत्कालीन सचिव संशयित अरुण काळे यांनी पोलिसांना तपास कामात सहकार्य न करणे, न्यायालयात तारखेस वेळीच हजर न राहणे, कागदपत्र सादर न करणे, आदेशाचे पालन न करणे या कारणाहून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काळे यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सोमवार (ता. ५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

तीही मुदत संपल्यानंतर त्यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी पुढील चौकशीसाठी बाजार समितीतील छपाई विभागातील महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले होते. तीस न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT