Inspector of local crime branch along with suspected accused esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : खोटा मेसेज दाखवून फसवणुक करणारा संशयित जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कपड्यांची खरेदी करून बिलाचा खोटा मेसेज दाखवून फसवणुक करणारा एका संशयित जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मयुर निकम करीत आहेत. यासिम रहमान शेख (वय ३७, रा. प्लॉट नं २५, १० नं. रोड, हक्कानी मजिद, गोवंडी,) हे ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड परिसरातील जय भवानी रोडवर एकावन्न वर्षीय ईश्वर शांतीलाल वर्मा हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. वर्मा यांचे जत्रा हॉटेल चौफुली येथे इनर कॅन्फ्रट नावाने कपड्याचे दुकान आहे. या ठिकाणी ३ मे २०२४ रोजी संशयित याने दोन ट्रक पँट, तीन टी शर्ट.

एक लेडीज टी शर्ट असा एकुण जवळपास १० हजार रुपये किमतीच्या कपड्यांची खरेदी केली. सदर बिल रक्कम पोटी, बिल रक्कम भरल्याचा खोटा मेसेज दाखवून सेल्स गर्लची फसवणुक करून पसार झाला होता. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मयूर निकम करीत असताना सदर फरार संशयित हा उपनगर परिसरात आला असल्याची गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सापळा रचून संशयित यासिम रहमान शेख (वय ३७, रा. प्लॉट नं २५, १० नं. रोड, हक्कानी मजिद, गोवंडी,) यास ताब्यात घेतले. या संशयितांची चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली. (latest marathi news)

"यांनी बजाविली कामगिरी "

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रविण चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक निखील बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण दाइंगडे.

मयुर निकम,पोलिस हवालदार सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, शिवाजी आव्हाड, ज्ञानेश्वर कहांडळ, निलेश काटकर,दादासाहेब वाघ, पोलिस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहिकर, निखिल वाघचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख अशांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT