Shantigiri Maharaj esakal
नाशिक

Nashik Shantigiri Maharaj : देशासाठी निष्काम भावनेने कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाच मतदान करा : स्वामी शांतीगिरी महाराज

Nashik News : स्वामी शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा निवडणुकीत स्वतः अपक्ष उमेदवारी करत असून प्रचारात त्यांनी जोरदार आघाडी घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राजकारणात निस्वार्थ-त्याग-वैराग्यता आणि सेवा-समर्पण असा भाव असणे आता गरजेचे आहे. अशा विचारातूनच देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीच जय बाबाजी भक्त परिवाराने राजकारणाच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. मतदान सर्वश्रेष्ठ दान आहे. नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावे. (Swami Shanti Giri Maharaj statement Vote only for those who want to work for country with selfless spirit)

मतदान करतांना देश सेवेची निष्काम भावना असणाऱ्या व्यक्तींनाच मतदान करावे, असे आवाहन निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्म पिठाचे पिठाधिश्‍वर महामंडलेश्‍वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले आहे. अखिल भारतीय जय बाबाजी भक्त परिवार सात लोकसभा मतदार संघात निर्णायक भूमिकेत आहे.

स्वामी शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा निवडणुकीत स्वतः अपक्ष उमेदवारी करत असून प्रचारात त्यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. इतर सहा लोकसभा मतदार संघात देखील लाखोंच्या संख्येने असलेला जय बाबाजी भक्त परिवार निर्णायक भूमिकेत आहे. या मतदार संघातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी महामंडलेश्‍वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी हनुमानवाडी येथील कुटीया परिसरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

जय बाबाजी भक्त परिवार गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणाचे शुद्धीकरण ही मोहीम राबवत आहे. सध्याचे राजकारण म्हणजे चिंतेचा विषय झाला आहे. जनतेचा सेवक जनतेचा मालक बनू पहात आहे. आपला पिढीजात धंदा असल्यासारखे राजकीय नेते निवडणुकीला सामोरे जात आहे. आपल्या स्वार्थासाठी तरुणांना व्यसनाच्या आहारी लावले जात आहे. अनेक प्रकारचे प्रलोभन देऊन मतदात्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. (latest marathi news)

हे कृत्य भारतीय लोकशाही मोडीत काढण्याचे षडयंत्र आहे. त्यामुळे देश सेवेचा निष्काम भाव संपुष्टात आणला जात आहे. निवडणुका चांगल्या मार्गाने देखील जिंकता येतात. हे आम्ही नाशिकच्या निवडणुकीच्या माध्यमातून जय बाबाजी भक्त परिवार सिद्ध करत आहे. त्यासाठी जनता जनार्दनाने देखील आता साथ द्यावी.

राज्यभरातील ठिकठिकाणी असलेला जय बाबाजी भक्त परिवार राजकारणाच्या शुद्धीकरणाचे अखंड कार्य करत आहे. जय बाबाजी भक्त परिवार सात ठिकाणी निर्णायक भूमिकेत असून छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगांव, जालना, दिंडोरी, शिर्डी आदी लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत देखील नि:स्वार्थी व देशभक्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्रिय सहभागी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT