Akash Dhanwate esakal
नाशिक

Nashik Sweeper Murder Case: सराईत गुंड व्यंक्या मोरेच्या सांगण्यावरून आकाशचा खून! तिघा संशयितांना पाच दिवसांची कोठडी

Latest Crime News : २०२१ मधील संशयित दाते व मयत आकाश यांच्यातील मारहाणीच्या गुन्ह्यात साक्ष न देण्याचा दबाव सराईत गुंड व्यंकटेश मोरे, मकरंद देशमुख यांनी आकाशवर आणला आणि त्यांच्याच सांगण्यावरून संशयितांनी आकाशचा खून केल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Sweeper Murder Case : गणेशोत्सवात वादावरून सफाई कामगार आकाश धनवटे याच संशयित तिघांनी चॉपर वार करून पंडित कॉलनीत खून केल्याचे तात्कालिक कारण समोर आले. मात्र २०२१ मधील संशयित दाते व मयत आकाश यांच्यातील मारहाणीच्या गुन्ह्यात साक्ष न देण्याचा दबाव सराईत गुंड व्यंकटेश मोरे, मकरंद देशमुख यांनी आकाशवर आणला आणि त्यांच्याच सांगण्यावरून संशयितांनी आकाशचा खून केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. दरम्यान अटक केलेल्या तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Sweeper Murder Case Three suspects remanded for five days)

मयत आकाश धनवटे याचा भाऊ मकरंद उर्फ सोमा संतोष धनवटे (रा. गोदावरी नगर, घारपुरे घाट) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित व्यंकटेश मोरे, मकरंद देशमुख, अथर्व दाते, अभय तुरे या तिघांसह एक अल्पवयीन संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वॉटरग्रेस कंपनीचा सफाई कामगार असलेल्या आकाश धनवटे (२२) याचा मंगळवारी (ता.१) पहाटे साडेसहाच्या सुमारास संशयित अथर्व, अभय व अल्पवयीन तिघांनी धारदार कोयता, चॉपरने वार करीत खून केला.

गणेशोत्सवातील कुरापत पण...

नुकताच झालेल्या गणेशोत्सवाच्या गणेशचतुर्थीच्या दिवशी मयत आकाश व संशयित अथर्व यांच्यात वाद झाला होता. त्याच रागातून संशयितांनी मंगळवारी त्याच्यावर खुनी हल्ला केला. मात्र त्यांच्यात २०२१ पासून वाद आहे. त्यावेळी त्यांच्यात मारहाण होऊन अथर्व याच्यावर गुन्हा दाखल आहे. (latest marathi news)

याच गुन्ह्यामध्ये संशयित व भाजपाच्या माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी असलेला व्यंकटेश मोरे, मकरंद देशमुख यांनी मयत आकाश यास २०२१ च्या गुन्ह्यात साक्ष न देण्यासाठी दबाव टाकत होता. त्यातूनच त्यांच्या सांगण्यावरून संशयितांनी आकाश याच्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.

अटकेची शक्यता!

मयत आकाशच्या खून प्रकरणात सराईत गुंड व्यंकटेश मोरे याचे नाव आल्याने त्याच्या अटकेची शक्यता व्यक्त होते आहे. दरम्यान, क्रांतीनगर येथील सुनील वाघ खुन खटल्यात व्यंकटेश मोरे यास न्यायालयाने २०२३ मध्ये दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

सध्या तो जामीनावर आहे. मात्र आकाशच्या खुनातही त्याचे नाव आल्याने पोलीस त्यास अटक करतात याकडे आता लक्ष लागून आहे. या प्रकरणामुळे घारपुरे घाट, अशोकस्तंभ परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस या परिसरात बारकाईने लक्ष ठेवून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Health Tips :  शरीरातील बॅड कोलोस्टेरॉल कमी करायचा आयुर्वेदीक फंडा, भाकरी करण्याआधी इतकच करा

'वक्फ बोर्डाच्या नावाखाली राज्यातील शांतता भंग केल्यास कठोर कारवाई करणार'; गृहमंत्र्यांचा कडक इशारा

बॉक्सर Mike Tyson अन् जॅक पॉलवर कोटींचा वर्षाव; जाणून घ्या संपत्ती किती ?

Swiggy-Zomato: स्विगी, झोमॅटो आणि झेप्टोबाबत देशातील बड्या उद्योगपतीचा इशारा, म्हणाले, भारत हा...

SCROLL FOR NEXT