Nashik News : स्वाईन फ्लूमुळे ५० वर्षीय पुरूष तर दिंडोरीतील ४२ वर्षीय महिला अशा दोघांचा मृत्यू झाला असून नाशिकमधील स्वाईन फ्लू बळींची संख्या आठवर पोचली आहे. जानेवारी पासून आतापर्यंत शहरात २८ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. २०२० व २१ मध्ये स्वाईन फ्लूने नाशिकमध्ये कहर केला होता. (Swine flu death toll rises to eight)
त्यानंतर २०२२ व २३ मध्ये स्वाईन फ्लूची लाट पूर्णपणे ओसरली. परंतू नाशिक मध्ये जानेवारी २०२४ मध्ये रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. जानेवारीत मध्ये एक रुग्ण आढळला. जानेवारी ते एप्रिल मध्ये स्वाईन फ्लूचे एकुण २३ रुग्ण आढळले. एप्रिलमध्ये जेलरोड येथील ५९ वर्षीय डॉक्टरचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला होता.
तर मे मध्ये सिन्नर मधील दातली गाव येथील एका ६३ वर्षीय महिला, मालेगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती, २९ वर्षीय महिला, निफाड येथील ६८ वर्षीय महिला, कोपरगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये मृत्यू झाला. (latest marathi news)
मागील आठवड्यात जेलरोड भागातील ५८ वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. दिंडोरीतील ४२ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लू नंतर मृत्यू झाला.
शहरात २८ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली. शहरात स्वाईन फ्लूची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा वैद्यकीय अधिक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.