Deputy Commissioner of Police Chandrakant Khandvi speaking at a workshop organized by Police Commissionerate on 'Tension Management'. esakal
नाशिक

Police Stress Management Workshop: कामाच्या व्यापातून स्वत:साठी वेळ काढा! ‘ताणतणाव’ कार्यशाळेत पोलिसांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Stress Management Workshop : शहराची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर असते. बंदोबस्त, गुन्हेगारांचा शोध, दिवस-रात्रीच्या कामाच्या वेळा यामुळे शरीराला पाहिजे असलेली विश्रांती मिळत नाही. परिणामी ताणतणाव वाढून त्यातून आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

सततच्या तणावाने नैराश्य येत असते. यावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या कामाकडे पाहिल्यास तणाव हलका होऊन २४ तासांतील अवघा दीड ते दोन तास स्वत:च्या आरोग्यासाठी प्रत्येकाने काढा, असे आवाहन कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी आलेल्या वैदयकीय तज्ज्ञांनी केले. (Nashik police tension stress management workshop)

कार्यशाळेत सहभागी अधिकारी-अंमलदार.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलीस आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी नियमित ताणतणाव मुक्तीसाठी कार्यशाळा घेतली जाते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयाच्या भीष्मराज बाम सभागृहामध्ये आयुक्तालयातील अधिकारी, अंमलदारांसाठी ताणतणाव जीवनशैली व व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डॉ. संतोष घेगडमल, डॉ. विलास चकोर, डॉ. सानप यांनी कार्यशाळेत सहभागींना मार्गदर्शन केले.

पोलीस दलात काम करीत असताना कामाच्या वेळा निश्चित नाहीत. त्यामुळे आहार आणि झोपाच्या वेळी अनिश्चित आहेत. त्याचा परिणाम आरोग्यावर होऊन ताणतणाव वाढतो. त्यामुळे कामाव्यतिरिक्त प्रत्येकाने स्वत:साठी किमान दोन तास काढून या वेळेत आपले छंद जोपासावे. (latest marathi news)

फिरायला जावे, ट्रेकिंग करावे. याशिवाय व्यायाम, योगासाने, प्राणायक करावेत. कुटूंबियांशी संवाद साधून त्यांच्यात वेळ घालावावा. यातून सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागून शरीरावरचा ताण हलका होण्यास मदत होते. तसेच, आपल्यावरील जबाबदारीकडे सकारात्मकतेने पाहिल्यास कामाचाही ताण हलका होण्यास मदतच होते. यातूनही नैराश्य वा कामाचा ताण जाणवत असेल तर अशावेळी आपल्या डॉक्टरांशी संवाद साधावा असेही आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.

प्रारंभी पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी प्रास्ताविक केले. तर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी, पोलीस दलातील अधिकारी-अंमलदारांकडे असलेली कामाची व्याप्ती पाहता त्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आपल्यामध्येच सकारात्मक बदल करून घेण्याची गरज असल्याचे म्हणाले. गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी आभार मानले. या कार्यशाळेसाठी आयुक्तालय हद्दीतील ३० अधिकारी व २५० अंमलदार उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Shinde Encounter: शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत मोठी अपडेट! सुप्रीम कोर्टाने सर्वच राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आदेश

SEBI: शेअर बाजारात मोठा स्कॅम? छोट्या कंपन्यांनी IPOमध्ये घातला घोळ; सेबीचा धक्कादायक खुलासा

छोटा भीम ते महाराजा, ऑस्करला जाण्यापूर्वी लापता लेडीज'ची 'या' चित्रपटांसोबत होती टक्कर; कुठे पाहाल हे सिनेमे?

MP Supriya Sule : खटला चालवून आरोपीला फाशी दिली असती तर पहिला पेढा मी मुख्यमंत्र्यांना दिला असता

Latest Maharashtra News Updates Live: अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयात ठेवणार

SCROLL FOR NEXT