Tanker water supply stopped in 25 villages in Nandgaon esakal
नाशिक

Nashik News : नांदगावमधील 25 गावांत टँकरने पुरवठा बंद! टँकरमुक्तीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : जूनमध्येच समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील २५ गावांतील टँकर बंद झाले, हा दिलासा असला तरी अद्यापही चाळीसहून अधिक गावे व अडीचशे वाड्या-वस्त्यांमध्ये ऐन पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस झाला, तरी टँकरमुक्त होण्यासाठी दमदार पावसाची मात्र आवश्यकता आहे. (Tanker water supply stopped in 25 villages in Nandgaon)

टँकरमुक्तीच्या दिशेने मात्र सकारात्मक बाब म्हणजे ६६ पैकी २५ गावांतील टँकर बंद झाले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये अवघ्या १२ ते २० मिली एवढाच पाऊस झाला, तेव्हापासून यंदाच्या जूनपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी दुष्काळ आला अन् जिल्ह्यातील सर्वाधिक टँकरची संख्या नांदगाव तालुक्यात राहिली.

गेल्या वर्षी ९ जूनला शास्त्रीनगर, नवसारी, बोयेगाव या तीन गावांत सर्वप्रथम टँकर सुरू झाले होते. त्यातील शास्त्रीनगरचे एकमेव टँकर बंद झाले. यंदा पावसाने चांगली हजेरी लावली. आजअखेर १२४.०४ मिली एवढ्या पावसाची नोंद झाली. त्याचा परिणाम एकूण २५ गावे व वाड्या-वस्त्यांसाठी लागणारे ३० टँकर मात्र बंद करावे, असा अहवाल आल्याने ते बंद झाले. (latest marathi news)

असे असले, तरी ज्या गावातील टँकर बंद झाले, त्याठिकाणी भूगर्भातील जलाशयाचा साठा अवघे दोन महिने पुरेल एवढाच असल्याने दमदार पावसाची जनतेला प्रतीक्षा लागली आहे. भौरी, खिर्डी, बाणगाव बुद्रुक, तांदूळवाडी, भालूर, नागापूर, पोखरी, गंगाधरी, शास्त्रीनगर, हिंगणवाडी, जामदरी, श्रीरामनगर.

जळगाव बुद्रुक, लक्ष्मीनगर, हिसवळ खुर्द, साकोरा, बाणगाव खुर्द, टाकळी खुर्द, टाकळी बुद्रुक, मूळडोंगरी सटाणे, मालेगाव कर्यात, वडाळी या गावांतील एकूण २५ टँकर बंद झाले; तर साकोरा गावातील टँकर बंद झाले असले, तरी या गावातील वाड्या-वस्त्यांना मात्र टँकर सुरूच आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT