Municipal employees disconnecting taps of defaulters. In the second photo, municipal officials and employees during the recovery campaign. esakal
नाशिक

Nashik News : येवल्यात थकबाकीदारांवर नळ तोडणीची कारवाई; 4 कोटीहून अधिक कर वसुली बाकी

Nashik : नगरपालिकेच्या वसुली मोहिमेला गेल्या तीन-चार महिन्यापासून वेग आला असून मार्च अखेर जवळ आल्याने वसुलीची जोरदार मोहीम सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नगरपालिकेच्या वसुली मोहिमेला गेल्या तीन-चार महिन्यापासून वेग आला असून मार्च अखेर जवळ आल्याने वसुलीची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. नगरपालिका वर्षभर सेवा देऊनही अनेक नागरिक कर भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील नगरपालिका ॲक्शन मोडवर आली असून दहाहून अधिक थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई झाली आहे. (nashik Tap cutting action against defaulters in yeola marathi news)

नळतोडणीसह या पुढील टप्प्यात मालमत्ता सील करणे, नावे जाहीर करणे यासारख्या मोहिमा राबविल्या जाणार आहेत. राज्यात सर्वात पहिली ‘ब’ वर्ग दर्जा मिळालेल्या येथील पालिकेचा विकासाचा गाडा आणि वसुलीचा आराखडा मोठा आहे. विशेष म्हणजे कोटयावधीच्या आसपास कर्जाचे ओझे पालिकेवर असल्याने दरवर्षी करवसुली आणि विविध माध्यमातून मिळणारे उत्पन्न हाच पालिकेचा वर्षाचा गाडा हाकण्याचा हक्काचा फंड असतो.

मार्चच्या अखेरीस पालिकेची ९० टक्‍क्‍यांच्या आसपास वसुली होते. परंतु अद्याप हाच आकडा ४० ते ५० टक्क्यांवर अडकला आहे. शहराचा विस्तार वाढला असून पालिकेला शहरवासीयांकडून सुमारे सहा कोटी रुपयांची घरपट्टी तर दोन कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल होते. पालिकेने शहरात विभागनिहाय वसुली पथक नेमले आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच वर्षभराची मालमत्ता कर व पाणीपट्टी तसेच गाळे भाडे पट्टीच्या पावत्यांचे वाटप केले आहे.

मात्र नागरिक कर भरत नसल्याने थकबाकी रक्कम साडेतीन ते चार कोटीवर अडकून पडली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी रोहित पगार,कर निरीक्षक ए. एस. मुरकुटे, कर अधीक्षक चंद्रकांत भोई, विष्णू हाडके, श्री. पाडवी, श्री. पारधी, शशिकांत मोरे, उदय परदेशी आदींचे पथक वसुलीसाठी विशेष लक्ष देऊन आहे.

धडक कर वसुली मोहीम

एक मार्चपासून यासाठी मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कर वसुली मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात दहाहून अधिक नळ कनेक्शन तोडण्यात आले असून प्रतिसाद न देणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांवर यापुढे नळतोडणी, मालमत्ता सील करणे तसेच थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजावण्याचे आंदोलनही सुरू होणार आहे.

या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत सुमारे ५० टक्के पेक्षाही कमी वसुली झाली असून शासनाने शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट न गाठल्यास पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान रोखण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील वेळेत कर भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

''शासनाने पाणीपट्टी, गाळा भाडे, तसेच मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. यावरच पालिकेचे विविध निधीचे गणित अवलंबून असते. शिवाय शहराच्या विविध गरजाही या निधीतून भागवायच्या असतात. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरून सहकार्य करावे.''- किरण देशमुख, मुख्याधिकारी येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT