food  esakal
नाशिक

Nashik News : सशक्त पोषण योजनेच्या पदार्थांची गोडी; 28 हजार 611 विद्यार्थी घेताहेत लाभ

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सशक्त पोषण योजनेतून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार, पारंपरिक खिचडीसोबतच १५ प्रकारचा पूरक आहार देण्यात येत असल्याने ग्रामीण, आदिवासी दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना या पौष्टिक व रुचकर आहाराची गोडी लागली आहे. (taste of foods of strong nutrition plan 28 thousand 611 students are benefited)

इगतपुरी तालुक्यात या योजनेत २७१ शाळांमधील २८ हजार ६११ विद्यार्थ्यांना लाभ घेत असल्याची माहिती इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील व शालेय पोषण आहार योजनेचे अधिक्षक सुरेश सोनवणे यांनी ‘सकाळ’ला दिली. योजनेत पहिली ते पाचवीच्या २४९ शाळांतील १८ हजार १४५ तर सहावी ते आठवीच्या १२५ शाळांतील १० हजार ५२१ विद्यार्थांचा समावेश आहे.

माध्यान्ह भोजन योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २००८-०९ मध्ये सुरु झाली. ही योजना केंद्र सरकारपुरस्कृत असून, त्यासाठी हजारो रुपयांचे अनुदान दिले जाते. ऑगस्ट २०२१ मध्ये अतिरिक्त पोषणमूल्य असलेल्या ‘न्यूट्रिटिव्ह स्लाइस’ (स्पेशली डिझाइन प्रोटिन बिस्कीट) देण्याचा निर्णय झाला होता. आता विविध प्रकारचा पोषण आहार दिला जात आहे.

शिजवून करावयाच्या आहार

- सोमवार : व्हेज पुलाव + मिलेट बार

- मंगळवार : मूगदाळ खिचडी+मिलेट बार

- बुधवार : मसूरडाळ पुलाव +मिलेट बार

- गुरुवार : मटकी उसळ व भात +मिलेटबार

- शुक्रवार : अंडा पुलाव + मिलेटबार

- शनिवार : गोड खिचडी+ मिलेटबार (latest marathi news)

इगतपुरी शाळा विद्यार्थी संख्या

- पहिली ते पाचवी २४९ १८ हजार १४५

- सहावी ते आठवी १२५ १० हजार ५२१

"यंदा शैक्षणिक सत्र सुरु झाल्यापासून पोषण आहार देण्यात येत आहे. काही संभाव्य अडचणी उद्भवल्यास तत्काळ सोडविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे." - सुरेश सोनवणे, अधीक्षक, शालेय पोषण आहार, पंचायत समिती, इगतपुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद पाडू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचे जोरदार आंदोलन

IT Act Amendment: मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका! IT कायद्यातील घटनादुरुस्ती रद्द करण्याचे आदेश; युट्यूब, फेसबुक, ट्विटरला दिलासा

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

SCROLL FOR NEXT