Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक संदीप गोपाळराव गुळवे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जवळपास निश्चित मानली जात आहे. रविवारी (ता. २) त्यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीकडून अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (Teacher Constituency Election Announcement of candidature)
राज्यातील मोठी शिक्षण संस्था असलेल्या ‘मविप्र’ समाजाच्या निवडणुकीत संदीप गुळवे यांनी मिळविलेला हजारी विजय, पाचही जिल्ह्यांत पूर्वीपासून सलोख्याचे संबंध त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून जाणार आहे. एकूणच, उमेदवारी मिळाल्यास शिक्षकांना त्यांचा हक्काचा प्रतिनिधी मिळणार असून.
त्यांच्या मागण्या आणि नवीन धोरणांविषयी मोठे काम करणार असल्याचा श्री. गुळवे यांचा निर्धार आहे. त्यांचे वडील (कै.) गोपाळराव गुळवे यांचे सर्वच संस्थांशी असलेले संबंध, तसेच संदीप गुळवे यांच्या कार्याची पद्धत व अजातशत्रू व्यक्तिमत्त्व नाशिक विभागासाठी महाविकास आघाडीला फायदेशीर ठरेल.
पाच जिल्ह्यांचा असलेला विस्तार पाहता गेल्या वर्षभरापासून प्रत्येक शिक्षण संस्थाचालकाची भेट घेऊन संदीप गुळवे यांनी प्रचारातही आघाडी घेत प्रतिस्पर्धी उमेदवारांना आव्हान उभे केले आहे. महिन्यावर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत अंतिम चित्र स्पष्ट होणे बाकी असले, तरी आपण लढू आणि जिंकू, असे गुळवे ठामपणे सांगत आहेत. भक्कम उमेदवारामुळे लढाईत रंगत आलेली आहे. (latest marathi news)
मागील निवडणुकीत किशोर दराडे निवडून आले होते. त्यांच्यासमोर तेव्हा हवा तसा उमेदवार उभा ठाकला नव्हता. यंदा मात्र संदीप गुळवे यांची असलेली स्वच्छ प्रतिमा आणि अजातशत्रू व्यक्तिमत्वामुळे तसेच त्यांनी केलेले कार्य पाहता शिक्षक वर्ग त्यांची दखल घेतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुळवे विरुद्ध दराडे लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहील, यात शंका नाही.
गुळवेंची प्रचाराची एक फेरी पूर्ण
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी २६ जूनला मतदान होणार आहे. मागील निवडणुकीत विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी विविध नीतींचा अचूक वापर करून विजयश्री खेचून आणली होती; परंतु यंदा ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. ॲड. संदीप गुळवे यांचे कडवे आव्हान यंदा आहे. ‘मविप्र’चे विस्तृत जाळे, तसेच इतर जिल्ह्यांतील पाठीशी असलेले बळ गुळवे यांची धार तीव्र करणारे आहे.
श्री. गुळवे यांची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली असून, प्रत्येक तालुक्यात त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी मजबूत आणि नियोजनबद्ध प्रचार पद्धत अवलंबली आहे. सर्वांत जास्त व निर्णायक मतदान नाशिक जिल्ह्यात आहे. त्यामुळे आगामी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा रंगतदार होईल.
"ॲड. संदीप गुळवे यांनी उमेदवारी केल्यास खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या मागण्यांसाठी एक अभ्यासू व धोरणात्मकदृष्ट्या भविष्याचा वेध असलेला प्रतिनिधी लाभणार आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या श्री. गुळवे यांना ज्ञात आहेत. सर्वच बाबी अभ्यासून न्याय देण्याचे काम गुळवे करू शकतात, हे मात्र विरोधकही नाकारू शकत नाहीत." - प्रा. डॉ. संजय शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व सेवक संचालक, ‘मविप्र’ समाज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.