vivek kolhe and rajendra vikhe  esakal
नाशिक

Nashik Teacher Constituency : दराडेंसह कोल्हे, विखेंच्या एन्ट्रीने येणार रंगत! नाशिक शिक्षक आमदार निवडणुकीत भरली चुरस

Teacher Constituency : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी पुन्हा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे.

संतोष विंचू

Nashik Teacher Constituency : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी पुन्हा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. आता कोपरगाव येथील साखरसम्राट कोल्हे कुटुंबातील विवेक कोल्हे तसेच मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील यांचीही तयारी सुरू झाल्याने शिक्षक मतदारसंघाचा आखाडा जोरात रंगणार आहे. तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरत असल्याने या निवडणुकीच्या राजकारणाची सूत्रे थेट मुंबईतून हालतील, असे दिसते. ()

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण विभाग पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे व मुंबई विभागाचे शिक्षक कपिल पाटील यांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ ला संपत आहे. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी शिक्षक मतदारसंघाचा जाहीर झालेला कार्यक्रम आमदार कपिल पाटील यांच्या मागणीनुसार पुढे ढकलला होता. आता हा कार्यक्रम जाहीर झाला असून, शाळा सुरू झाल्यावर २६ जूनला निवडणूक होणार असल्याने उमेदवारांना प्रचाराला सोपे वातावरण तयार झाले आहे.

मात्र दहा दिवसांपूर्वी आमदार दराडे व ‘मविप्र’चे संचालक संदीप गुळवे यांच्यातच दिसणारा सामना आता वेगळ्या वळणावर गेला आहे. मुदतवाढ मिळाल्याने वाढीव कालावधीत कोपरगाव येथील संजीवनी ग्रुपचे विवेक कोल्हे शिक्षक मतदारसंघाच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा आहे. किंबहुना कोल्हे परिवाराने पाच जिल्ह्यात संस्थाचालकांच्या भेटी घेऊन आम्ही लढणार हा संदेश दिला आहे.

दुसरीकडे यापूर्वी पदवीधरसाठी इच्छुक असलेले राजेंद्र विखे यांनीही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. अर्थात भाजपत असलेल्या कोल्हे कुटुंबाला कोपरगाव विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाला जाणार असल्याने मतदारसंघ उरलेला नाही. त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास विखे थांबतील का लढतील, याविषयी साशंकता आहे.(latest marathi news)

इच्छुकांची संख्या वाढू लागली...

या मतदारसंघावर वर्षानुवर्षे वर्चस्व राहिलेल्या टीडीएफ शिक्षक संघटनेने नगरचे भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ‘टीडीएफ’चे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह यांनी कचरे यांच्या नावाची घोषणा सोमवारी (ता. २०) केली. आमदार कपिल पाटील यांच्या आग्रहाखातर शिक्षक भारतीकडून समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे तसेच मालेगाव येथील ‘टीडीएफ’चे नेते आर. डी. निकमही इच्छुक आहेत. इच्छुकांची संख्या वाढल्याने या निवडणुकीत चुरस वाढणार आहे.

युती आघाडीचे उमेदवार कोण

विधान परिषदेचे संख्याबळ महत्त्वाचे असल्याने सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीला प्रतिष्ठेची बनविणार असल्याचे दिसते. त्या दृष्टीने प्रमुख नेत्यांनी चाचपणीही केली आहे. अद्याप तरी महायुती-विकास आघाडीकडून कुणाची उमेदवारी जाहीर झालेली नाही. गेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत दराडे यांनी या मतदारसंघात बाजी मारली आहे. या वेळी दराडे हे शिंदे-फडणवीस-अजित पवार गटाकडून उमेदवारी घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचवेळी कोल्हेही भाजपकडून इच्छुक आहेत. गुळवे मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार होण्याची शक्यता आहे.

महिनाभरात प्रचाराची होणार कसरत

आमदार दराडे यांनी सहा वर्षांत शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून, गेल्या वर्षापासूनच त्यांनी निवडणुकीची तयारी चालवली आहे. मतदार नोंदणीपासून तर संस्थाचालक व मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे दराडे यांची तयारी इतरांच्या एक फेरी पुढे असल्याचे दिसते. विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाचा विस्तार पाच जिल्हे आणि ५४ तालुक्यांचा आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणा सक्रिय करणे, नियोजन करताना उमेदवारांची परीक्षाच होणार आहे. त्यातच आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरणाऱ्या उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसते.

''शिक्षकांसाठी सहा वर्षांत अनेक प्रश्नांची सोडवणूक करून खूप चांगले काम करू शकलो, याचे समाधान आहे. आजही शिक्षकांच्या प्रश्नी आदिवासी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. रखडलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी योगदान देत राहील. केलेल्या कामाचे समाधान असून, यापुढील काळातही पुन्हा शिक्षकांचे प्रतिनिधित्व करून चांगले काम करण्याचा मानस आहे.''- किशोर दराडे, शिक्षक आमदार, नाशिक विभाग

अशी आहेत मतदार संख्या

जिल्हा - तालुके - मतदार

नाशिक - १५ - २३५६३

नगर - १४ - १४६४४

जळगाव - १५ - १८२०९

धुळे - ४ - ८०७३

नंदुरबार - ६ - ५४२२

एकूण - ५४ - ६४९११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT