Teachers Constituency Election esakal
नाशिक

Nashik Teachers Constituency : नंदुरबार, धुळे, जळगाववर शिक्षक आमदाराची मदार

Nashik : नाशिक शिक्षक मतदारसंघात एकूण २१ उमेदवार रिंगणात असले तरी महायुतीचे आमदार किशोर दराडे, महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यातच खऱ्या अर्थाने तिरंगी लढत होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात एकूण २१ उमेदवार रिंगणात असले तरी महायुतीचे आमदार किशोर दराडे, महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. संदीप गुळवे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यातच खऱ्या अर्थाने तिरंगी लढत होत आहे. रिंगणात असलेल्या २१ उमेदवारांपैकी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. धुळे येथील दोन आणि जळगावचा एक उमेदवार रिंगणात आहे. (Teachers Constituency Most candidates from Ahmednagar Nashik district)

नंदुरबारमधील एकही उमेदवार नाही. त्यामुळे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील मतांचे विभाजन होणार असल्याने नंदुरबार, जळगाव व धुळे जिल्ह्यातील शिक्षकच विभागाचा आमदार ठरविणार आहे. विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ जूनला मतदान होणार आहे. १२ जूनच्या अंतिम मुदतीपर्यंत रिंगणातील १५ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर २१ उमेदवार रिंगणात आहेत.

रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार माघार घेऊन अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देतील, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात १५ उमेदवारांनी माघारी घेतल्या. यातील बोटावर मोजण्याइतक्या उमेदवारांनी अधिकृत उमेदवारास पाठिंबा दिला. सर्वाधिक शिक्षक मतदार नाशिक जिल्ह्यात आहे. येथून तब्बल नऊ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवार नाशिक जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे त्यांची मदार ही जिल्ह्यातील मतदारांवर असणार आहे. जिल्ह्यातील मोठ्या तसेच छोट्या शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची भूमिका यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. माघारीपूर्वी अहमदनगरमधून तब्बल १४ उमेदवार रिंगणात होते. त्यातील पाच जणांनी माघार घेतली असून, आता नऊ उमेदवार नशीब आजमावत आहेत. (latest marathi news)

नाशिक आणि नगर येथील शैक्षणिक संस्था आणि शिक्षक मतदारांची संख्या पाहता स्थानिक एकगठ्ठा मते मिळवण्याचा उमेदवाराचा प्रयत्न असणार आहे. अहमदनगरमधून ‘टीडीएफ’चे भाऊसाहेब कचरे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांची मदार अहमदनगर येथील मतांवर असणार आहे. त्यात इतर अपक्ष किती मते घेतात, त्यावर दोघांच्या मतांचे समीकरण अवलंबून असेल.

धुळे व जळगाव जिल्ह्यात तुलनेने उमेदवारांची संख्या कमी आहे. तसेच नंदुरबारमध्येही मतदारांची संख्या कमी असली तरी, या तीन जिल्ह्यातील मतदारांची संख्या पाहता त्या मतदारांचा कौल विजयी उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची या तीन जिल्ह्यातील शिक्षकांकडे नजर आहे.

विभागातील मतदार

जिल्हा............................२०२४..........प्रलंबित अर्ज

नाशिक.......................२३५९७.........२१८३

धुळे..................................८०८८..............८०

जळगाव.........................१३०५६...........५८

नंदुरबार..........................५४१९.............१०३

अहमदनगर....................१४६९२..........३११५

एकूण............................६४८०२...........५५३९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT