Election workers checking materials for voting in the Teachers' Constituency Elections. esakal
नाशिक

Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदार आज बजावणार हक्क; जिल्ह्यात 25 हजार 302 मतदारांसाठी 29 मतदान केंद्र

Teacher Constituency : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता. २६) पाच जिल्ह्यांत मतदान होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Teacher Constituency : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता. २६) पाच जिल्ह्यांत मतदान होणार आहे. नियुक्त अधिकारी, कर्मचारी मंगळवारी मतदान केंद्रांकडे मार्गस्थ झाले. एकट्या नाशिक शहरात दहा मतदान केंद्र आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील २९ केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६, या वेळेत मतदान होणार आहे. (Teachers voters will exercise their rights today )

नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील एकूण ६९ हजार ३६८ शिक्षक मतदान करू शकणार आहेत. एकूण २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार असून, उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रमांक नोंदवून शिक्षकांना मतदान करता येणार आहे. मतदानासाठीचे बॅलेट पेपर, पाच टक्के अतिरिक्त बॅलेट पेपर, पेन, शाई यांसारखी आवश्यक सामग्री घेऊन कर्मचारी मंगळवारी सकाळी मतदान केंद्रांकडे रवाना झाले.

मतदारसंघात सर्वाधिक २५ हजार ३०२ मतदार नाशिकमध्ये आहेत. जिल्ह्यातील २९ केंद्रांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. शहरातील दहा मतदान केंद्रांसह सटाणा, येवला, निफाडसह मालेगाव ग्रामीणमध्ये प्रत्येकी दोन, तर देवळा, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नरसह मालेगाव शहरात प्रत्येकी एक केंद्र आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचाऱ्यांची नियुक्त केली आहे. यामध्ये एक केंद्राध्यक्ष, तीन कर्मचारी, एक सूक्ष्म निरीक्षकासह शिपायाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १७४ कर्मचाऱ्यांची मतदानप्रक्रियेसाठी नियुक्ती केली असून, याशिवाय प्रत्येक केंद्रावर दोन पोलिस कर्मचारी बंदोबस्ताला असणार आहेत. (latest marathi news)

ॊॊ‘बाबू भगरे पॅटर्न’चा धसका

सर्वसामान्य निवडणुकीपेक्षा शिक्षित मतदारांची मते अवैध ठरवण्याचे प्रमाण अधिक असल्याने या निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी काळजी घेतली आहे. मतदारांनी आपला हक्क बजावताना काय काळजी घ्यावी, याविषयी स्पष्ट सूचना दिल्या जात आहेत. तर नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांची संख्याही अधिक असल्याने ‘बाबू भगरे पॅटर्न’ या निवडणुकीतही दिसून आला. त्यामुळे मतविभाजन होऊ नये, याची काळजीही उमेदवार प्रतिनिधी घेत आहेत. आपल्या उमेदवारांचा अनुक्रमांक लक्षात ठेवून त्यांच्यासमोर पहिल्या पसंतीचे मत नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

सोमवारी निकाल

विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी १ जुलैला नाशिक शहरातील अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गुदामामध्ये होणार आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी याच ठिकाणी झाली होती. शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीचा ‘पॅटर्नच’ वेगळा आहे. यात एकूण झालेल्या मतदानात वैध ठरलेली मते भागिले दोन करून मतांचा कोटा ठरविण्यात येईल.

पहिल्या पसंतीची मते मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास शेवटच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपैकी दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. अशा पद्धतीने कोटा पूर्ण होईपर्यंत पुढील प्रत्येक उमेदवाराची मते मोजली जातात. शेवटच्या फेरीपर्यंत कोटा अपूर्ण राहिल्यास सर्वाधिक मते असणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT