Deputy Director of Education Dr. B. B. While giving a statement to Chavan on behalf of Shiksha Bharati Sangathan, Bharat Shelar, K. K. Ahire, Rajendra Londhe. esakal
नाशिक

Nashik Teachers Union : पेहरावाबाबत शिक्षकांवर अविश्वास का? शिक्षक संघटना आक्रमक

Teachers Union : राज्यातील शिक्षकांच्या पेहरावासंदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करणारा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय हा केवळ शासन निर्णयात वाढ करणारा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Teachers Union : राज्यातील शिक्षकांच्या पेहरावासंदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करणारा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय हा केवळ शासन निर्णयात वाढ करणारा आहे. आजही अनेक शाळांमध्ये ड्रेस कोड लागू असून असे निर्णय काढून शासन शिक्षकावर अविश्वास का दाखवत आहे, त्याविरोधात शिक्षक भारतीने राज्य सरकारला निवेदन दिले आहे. शिक्षण उपसंचालक डॉ बी.बी.चव्हाण यांची शिक्षक भारती पदाधिकारी यांनी भेट घेऊन निवेदन दिले. (nashik Teachers union aggressive due to dress code is applicable in schools marathi news)

निवेदनात म्हटले आहे की संविधानानुसार कोणी कसा पेहराव घालावा याविषयी कोणतेही बंधन नाही. राज्यातील शाळांमध्ये वेगवेगळ्या बदलात शिक्षकांचे मोठे योगदान आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक शाळेत ड्रेस कोड स्वेच्छेने असतानाच हा अट्टहास का? आरटीई नियम २०११ मध्ये शिक्षकांची कर्तव्य दिली आहेत त्यात कुठेही पेहरावाबाबत म्हटलेले नाही, त्यामुळे या निर्णयावर फेरविचार करावा.

संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणारा शासन निर्णय आरटीई कायद्याशी विसंगत असणारा निर्णय आहे. हजारो शिक्षक अतिरिक्त करणारा, दुर्गम भागातील शाळा बंद करणारा आहे. संचमान्यता निकष शिक्षकांच्या बाबतीत निराशाजनक असून, शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारे संचमान्यतेचे निकष बदलावेत, किमान शिक्षक संच निर्धारित करावा, त्यावरही शासनाने विचार करावा अशीही मागणी संघटनेने केली आहे

मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मान द्यायचा असेल तर शिक्षण विभागातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी ठोस उपाययोजना करा असेही या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे सरचिटणीस भरत शेलार, राज्य उपाध्यक्ष के. के. अहिरे, राज्य सचिव राजेंद्र लोंढे, राज्य संघटक प्रकल्प पाटील, जिल्हाध्यक्ष साहेबराव कुटे, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा विसपुते, नाशिक शहराध्यक्ष रोहिणी खैरनार, प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष सुनील गांगुर्डे, राहुल औटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.(Latest Marathi News)

''शिक्षकांना ड्रेसकोड असणे आवश्यक असले तरी त्यात रंगाची सक्ती असू नये. टी-शर्ट वगैरे अपवाद वगळता कुणीही शाळेत घालत नाहीत. महिलांना बूट घालण्याची सक्तीही अनावश्यक वाटते.''- राहुल सोनवणे, शिक्षक नेते, मागासवर्गीय शिक्षक संघटना

''शिक्षकांसाठी समान ड्रेसकोडचा निर्णय अयोग्य वाटतो. समस्त शिक्षक नीटनेटका व स्वच्छ पेहराव परिधान करूनच शाळेत येत असतात. शाळेत शिक्षकांनी जीन्स घालू नये, मात्र ड्रेसकोडचा निर्णय व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे.''- शिवदास निकम, कार्याध्यक्ष, राज्य शिक्षक भारती, मालेगाव

''शिक्षिका बहुतांश साडीच परिधान करतात. अपवादात्मक ड्रेस वापरतात. एकसारख्या गणवेशाऐवजी शिक्षकांकडून संस्कार व अध्ययन-अध्यापन या बाबी महत्त्वाच्या वाटतात. पादत्राणे बूटच असावे, अशी सक्ती योग्य नाही. वस्ती- वाडी, तांड्यावर चिखलही तुडवावा लागतो.''- सुनीता देसले, शिक्षिका

''बदलत्या काळानुसार शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर जातात. आम्ही त्यादृष्टीने मॉडेल स्कूल बनविताना आधीच एकसंघ गणवेश संहिता पाळतो. अशा प्रकारे शिक्षिकांना सक्ती करणे याचा आम्ही विरोध करू.''- मनीषा विसपुते, जिल्हाध्यक्षा, महिला आघाडी शिक्षक भारती, नाशिक

''शिस्त, क्षमता व कर्तव्य या त्रिसूत्रीचा अवलंब गुरुजन करतात. शिक्षकांवर गणवेश संहिता लादणे योग्य नाही. त्यासाठी धुलाई भत्ता तरतूद करावी. संघटनात्मक पातळीवर आम्ही यापूर्वीही अशा निर्णयास विरोध केला आहे.''- पृथ्वीराज शिरसाठ, विभागीय अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ, नाशिक

''शिक्षकांच्या पेहरावाबाबतचा शासनादेश अप्रासंगिक आहे. शिक्षकांना शाळेत कोणता पेहराव केला पाहिजे, याची पूर्ण जाणीव असल्याने अशा प्रकारचे आदेश काढणे योग्य नाही. समाजात शिक्षकांविषयी गैरसमज पसरतो.''- विजय कोंबे, राज्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील व्हा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT